सुशिक्षित महिलांचे भावविश्व उलगडणारे "बर्नी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:06 IST2016-05-26T09:36:13+5:302016-05-26T15:06:13+5:30

शिवम लोणारी यांच्या "शिवलीला फिल्म्स"ची निर्मिती असलेला एका वेगळ्या विषयावरील तजेलदार अनुभव देणारा नीलिमा लोणारी दिग्दर्शित "बर्नी" हा चित्रपट ...

"Bernie" who unveils educated women's body | सुशिक्षित महिलांचे भावविश्व उलगडणारे "बर्नी"

सुशिक्षित महिलांचे भावविश्व उलगडणारे "बर्नी"

वम लोणारी यांच्या "शिवलीला फिल्म्स"ची निर्मिती असलेला एका वेगळ्या विषयावरील तजेलदार अनुभव देणारा नीलिमा लोणारी दिग्दर्शित "बर्नी" हा चित्रपट येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे. 'चिनू', 'गुलदस्ता' या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निमार्ते शिवम लोणारी यांचा हा तिसरा चित्रपट आहे. आजच्या सुशिक्षित महिलांचे भावविश्व उलगडणाऱ्या "बर्नी"चे दिग्दर्शन नीलिमा लोणारींच असून त्यांनी यापूर्वी एकूण तीन भिन्न जातकुळीच्या चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या 'चिनू' या चित्रपटाने महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. प्रा. सुभाष भेंडे यांच्या 'जोगीण' या कादंबरीवरून प्रेरित होऊन "बर्नी" या चित्रपटाच्या कथेचा विस्तार आणि पटकथा नीलिमा लोणारी यांनी लिहिली असून संवाद सचिन दरेकर यांचे आहेत. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने या चित्रपटातील "बर्नी"च्या प्रमुख भूमिकेत विशेष रंग भरले आहेत.

"बर्नी"चे उमलते उत्फुल्ल यौवन, कॉलेज क्वीन, तिच्या भोवती असलेला तरुणांचा घोळका. या घोळक्यात तिच्यावर फिदा झालेला राजकुमार. दोघांचं प्रेम फुलत जातं. पण तिच्या वडिलांची तब्येत एकाकी एकदम बिघडते. आणि तिचं आयुष्य एक वेगळ वळण घेते. वडिलांच्या आजारपणात तिला वडिलांना एक वचन द्यावे लागते ज्यामुळे तिला आपलं घर आणि आपल्या माणसांपासून दूर निघून जावं लागतं. तिच्या पुढच्या वादळी संघर्षमय प्रवासात मात्र ती अधिक प्रगल्भ बनत जातेङ्घ आणि शेवटी या खोट्या, दांभिक जगाशी दोन हात करत समाजात स्वत:च एक आदर्श स्थान निर्माण करते

डीओपी समीर आठल्ये यांची डोळ्याचे पारणे फेडणारी अप्रतिम सिनेमेटोग्राफी विशाल निसर्गरम्य गोव्याची सैर घडविते. त्याला तोडीसतोड म्हणजे अमितराजचे गोव्याच्या कल्चरला धरून तयार केलेले संगीत. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या गोवन कल्चरल पार्टी साँगची धम्माल उमेश जाधवच्या नृत्य दिग्दर्शनामुळे अधिक रंजक झाली आहे. अभिजित देशपांडे यांनी "बर्नी"चे संकलन केले असून कलादिग्दर्शन अनिल वात तर रंगभूषा कुंदन दिवेकर यांनी केली आहे. या चित्रपटाची वेशभूषा नीलिमा लोणारी व चैत्राली डोंगरे यांनी केली असून पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांनी दिले आहे.

सर्व कलावंतांचा अस्सल अभिनय ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाब म्हणता येईल. तेजस्विनी लोणारीचा या भूमिकेसाठी कस लागला आहे. तिचा 'चिनू', 'गुलदस्ता', 'वांटेड बायको नं. १', इत्यादी चित्रपटातला अभिनय आणि "बर्नी"तला अभिनय थक्क करणारा आहे, आणि तो तिच्या चाहत्यांनी पडद्यावरच पाहणे उचित ठरेल. बऱ्याच वर्षांनी नीलकांती पाटेकर पडद्यावर अवतरल्या असून दिग्दर्शिकेने त्यांची केलेली निवड अगदी योग्यच म्हणता येईल. सोबत राजन ताम्हाणे, भूषण पाटील, गिरीश परदेशी, सविता मालपेकर, किरण खोजे, सुमुखी पेंडसे, मौसमी तोंडवळकर, चैत्राली डोंगरे, राज हंचनालळे, राधिका देशपांडे इत्यादी कलावंतांच्या भूमिका आहेत

Web Title: "Bernie" who unveils educated women's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.