बबन या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 16:19 IST2017-07-29T10:49:55+5:302017-07-29T16:19:55+5:30

ख्वाडा या चित्रपटाच्या यशानंतर भाऊसाहेब कऱ्हाडे प्रेक्षकांसाठी बबन हा चित्रपट घेऊन येत आहे. बबन या चित्रपटाचा टीझर त्यांनी नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे.

Baban's movie teasers meet the teaser | बबन या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

बबन या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

वाडा या भाऊराव कऱ्हाडेंनी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकवला होता. भाऊराव कऱ्हाडे हे एक सामान्य शेतकरी असून त्यांनी त्यांची शेती विकून ख्वाडा हा चित्रपट बनवला आहे. त्यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई केली होती. त्यांच्या ख्वाडा या चित्रपटात शशांक शेंडे वगळता प्रेक्षकांना सगळेच नवीन चेहरे पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या यशानंतर बबन हा त्यांचा दुसरा चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. 
बबन या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. आता या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये सायकलवर बसलेले, चिखलात माखलेले आणि त्यानंतर बोटीत असणारे कपल पाहायला मिळत आहे. पण या टीझरमध्ये कुठेच आपल्याला नायक-नायिकेचा चेहरा दिसत नाहीये. या टीझरद्वारे या चित्रपटात कोण कलाकार आहेत आणि या चित्रपटाची कथा काय असणार याबाबत दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. हा टीझर पाहून या चित्रपटात एखाद्या गावातील कथा पाहायला मिळणार असल्याचे दिसून येत आहे. 
चित्राक्षा फिल्म्स प्रस्तुत बबन चित्रपटाची निर्मिती विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, भाऊसाहेब शिंदे आणि मोनाली संदीप फंड यांनी मिळून केली आहे. 
ख्वाडा या चित्रपटातीलच काही कलाकार प्रेक्षकांना बबन या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. हा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काहीच दिवस झाले आहेत. पण तरीही हजारोहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Baban's movie teasers meet the teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.