‘अवधूत वाडकर’चे अभिनयात पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 16:08 IST2018-07-09T16:04:08+5:302018-07-09T16:08:45+5:30

दादासाहेब फाळकेच्या कलाकृतींचा वारसा जपत काही तरुणांनी एकत्र येऊन ‘लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट तयार केला आहे.

avadhoota wadkar's debut in acting | ‘अवधूत वाडकर’चे अभिनयात पदार्पण

‘अवधूत वाडकर’चे अभिनयात पदार्पण

ठळक मुद्दे प्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर आणि अनय नाईक यांनी तरुणांना मंत्रमुग्ध करेल असे संगीत दिले आहे.

भारताच्या इतिहासातील पहिला चित्रपट ’राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके यांनी परदेशात जाऊन सिनेमाचे तंत्रज्ञान शिकून भारतात हा चित्रपट तयार केला. त्यावेळेस त्यांना कदाचित कल्पना सुद्धा नसेल की त्यांनी सुरु केलेला हा उद्योगसमूह पुढे जाऊन १०० वर्षांनी १९ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल करेल. गिरगाव येथील कोरोनेशन सिनेमा येथे हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांना दाखविला गेला. ४० मिनिटांचा मूक असलेला हा चित्रपट त्याकाळी अवघ्या १० हजारात तयार झाला होता. तर या चित्रपटाने ४७ हजार रुपयांचा गल्ला जमविला होता. फिल्म इंडस्ट्रीच्या भाषेत सांगायचं तर पहिलाच भारतीय चलचित्रपट सुपरहीट ठरला होता.

दादासाहेब फाळकेच्या कलाकृतींचा वारसा जपत काही तरुणांनी एकत्र येऊन ‘लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट तयार केला आहे. मात्र हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित न होता एचसीसी नेटवर्क मोबाईल ऍप वर प्रदर्शित होणार आहे. अशाप्रकारे एचसीसी नेटवर्क मोबाईल ऍपवर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असेल. भविष्यातील चित्रपट प्रदर्शनाची ही एकप्रकारे नांदी आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. दादासाहेब फाळके यांनी जशी दूरदृष्टी दाखवली तसंच काहीसं या मराठी तरुणांनी दूरदृष्टी दाखवली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केले आहे. तर कथा-पटकथा संजय मोरे यांचे आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे चेहरे आहेत तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुले, नयन जाधव, अवधूत वाडकर, संजय मोरे, कल्पेश सातपुते, भाग्येश केम्भवी व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.

तरुणाईने सजलेल्या या चित्रपटाला संगीत देखील तरुणाईला साजेसंच आहे. प्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर आणि अनय नाईक यांनी तरुणांना मंत्रमुग्ध करेल असे संगीत दिले आहे. या गीतांना तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्ते, मंगेश बोरगावकर, मुग्धा कऱ्हाडे, रोहित राऊत, भारती मढवी  या ताज्या दमाच्या गायकांनी स्वरसाज चढविलेला आहे

Web Title: avadhoota wadkar's debut in acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.