प्रेक्षकांचे लाडके थ्री इडियट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 10:56 IST2016-12-28T10:56:27+5:302016-12-28T10:56:27+5:30

प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय म्हणजे फोटोशुट. कुठे जाऊ फोटो काढू हा जीवनाचा नित्यनियमच बनला आहे. या फोटोशुटमध्येदेखील सेल्फी, पाउट असे ...

Audience's Three Idiots | प्रेक्षकांचे लाडके थ्री इडियट्स

प्रेक्षकांचे लाडके थ्री इडियट्स

रत्येकाच्या जिव्हाळयाचा विषय म्हणजे फोटोशुट. कुठे जाऊ फोटो काढू हा जीवनाचा नित्यनियमच बनला आहे. या फोटोशुटमध्येदेखील सेल्फी, पाउट असे अनेक प्रकार पाहायला मिळत असतात. ज्याप्रमाणे प्रत्येकाला सेल्फी जितका जवळचा आहे तितक्याच जवळची पाउट ही पोझदेखील आहे. अशा या पाउट पोझच्या प्रेमात प्रेक्षकांचे लाडके कलाकारदेखील पडले असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच अभिनेता भाऊ कदम यांनी सोशलमीडियावर एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये भाऊसोबत अभिनेता कुशल भद्रिके आणि अभिनेत्री श्रेया बुगडे आहेत. यामध्ये तिन्ही कलाकार साडीमध्ये झक्कास दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या या हटके फोटोमध्ये तिघांनी ही पाउट पोझ दिली आहे. त्यामुळे हा फोटो नक्कीच त्यांच्या चाहत्यांसाठी खास असणार आहे. त्याचबरोबर भाऊ आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगतात की, थ्री पाउटिंग लेडिज. त्यांच्या या फोटोला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तीन नारी लय भारी, कॉमेडीचे तीन अणुबाँम्ब अशा कमेंन्टदेखील दिसत आहेत. तसेच या तिघांना पाहून चाहत्यांना अशी ही बनवाबनवी या चित्रपटाची आठवण झाली असल्याचे त्यांनी आपल्या कमेंन्टच्या माध्यमातून सांगितले. ही तिन्ही कलाकार चला हवा येऊ दया या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवितात. त्यामुळे त्यांच्या या कॉमेडी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. तसेच भाऊ कदम यांचा लवकरच बोभाटा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातदेखील भाऊ हटक्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे आहेत. या चित्रपटामध्ये भाऊसोबत दिलीप प्रभावळकर, मयुरेश पेम, मोनालिसा बागल, संग्राम साळवी आदि कलाकारांचा समावेश आहे. 

Web Title: Audience's Three Idiots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.