श्रृती-गौरव अडकले विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 14:26 IST2016-12-04T14:26:10+5:302016-12-04T14:26:10+5:30

अभिनेत्री श्रृती मराठे आणि गौरव घाटनेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल साईट्सवर शेअर करण्यात ...

Audience Stories Stuck In Marriage | श्रृती-गौरव अडकले विवाहबंधनात

श्रृती-गौरव अडकले विवाहबंधनात

िनेत्री श्रृती मराठे आणि गौरव घाटनेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाचे फोटो नुकतेच सोशल साईट्सवर शेअर करण्यात आले आहेत. श्रृतीच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक ताºयांनी हजेरी लावली होती. तसेच श्रृती आणि गौरव सोबतचे अनेक झक्कास फोटो देखील कलाकारांनी शेअर केले आहेत. अभिजीत खांडकेकर, भार्गवी चिरमुले, अमृता खनविलकर, नेहा पेंडसे, संस्कृती बालगुडे, सोनाली खरे, हेमांगी कवी असे कितीतरी कलाकार श्रृती-गौरवच्या लग्नात धमाल करताना दिसले. नव वधुच्या वेषात सजलेली नवी नवरी श्रृती  लग्नात अतिशय सुंदर दिसत होती. तर श्ेरवानी घातलेला गौरव सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. श्रृतीच्या मेहंदी सोहळ््याचे  फोटो देखील फेसबूकवर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये संस्कृती बालगुडे आणि भार्गवी चिरमुले या दोघीही श्रृती सोबत मेहंदी लावताना दिसत होत्या. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सनई चौघड्यांचे मंगलमय सुरु घुमु लागले आहेत. कारण एका पाठोपाठ एक असे अनेक कलाकार या महिन्यात विवाहबदध झाले आहेत. मेहंदी. संगीत, हळद ते लग्नाच्या मंडपातील या नव विवाहीत जोडप्यांचे सर्वच फोटो सध्या चर्चेचा विषय झाले आहेत. सोशल साईट्सवर सगळीकडेच लग्नाचा धुमधडाका पहायला मिळत आहे. चिराग पाटील,मृण्मयी मराठे, पल्लवी पाटील, मयुरी देशपांडे, श्रृती मराठे यांच्या पंक्तीत आता लवकरच मयुरी वाघचा देखील समावेश होणार आहे. मयुरी पुढील वर्षी लग्न करणार असल्याचे कळतेय. आता या नंतर कोणत्या कलाकाराचे शुभमंगल होणार आहे हे तर लवकरच समजेल. तो पर्यंत आपणही मराठी चित्रपटसृष्टीतील या सिताºयांचे लग्नसोहळे एंजॉय करुयात. 

 

Web Title: Audience Stories Stuck In Marriage