"महाराज भोंदू निघतात, तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण?" अतुल कुलकर्णींची पोस्ट; विचारले टोकदार प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 13:10 IST2026-03-22T13:10:11+5:302026-03-22T13:10:28+5:30
भिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक मर्मभेदी पोस्ट लिहली आहे.

"महाराज भोंदू निघतात, तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण?" अतुल कुलकर्णींची पोस्ट; विचारले टोकदार प्रश्न
सध्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जादूटोणा, तंत्र-मंत्र आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याचे समोर येत आहे. अनेक बडे राजकारणी आणि मंत्री या भोंदूबाबाच्या दरबारी हजेरी लावत असल्याचे फोटो आणि माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता याच पार्श्वभूमीवर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर एक मर्मभेदी पोस्ट लिहली आहे.
अतुल कुलकर्णी हे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते अनेक मुद्द्यांवर त्यांची मतं मांडत असतात. आता अतुल कुलकर्णी यांनी भोंदू बाबा, त्यांचे भक्त आणि त्यामागील राजकारण, धर्मकारण यावर लिहलं, "पकडले गेले कीच आणि तरच भोंदू ? त्या आधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते? ज्या वेळी कुणी महाराज भोंदू 'निघतात, तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण होतात, भागीदार, पीडित, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?", असा सवाल त्यांनी केला.
पुढे अतुल कुलकर्णी विचारतात, "श्रद्धा, अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय? डोळस आणि अंध श्रद्धामध्ये अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे ? अंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते?".
अतुल कुलकर्णी यांच्या पोस्टचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी याची तुलना राजकारणाशी केली आहे. ते म्हणतात, "हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)".