पाहा अश्विनी भावे यांच्या अमेरिकेतील घराची झलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 15:14 IST2021-04-22T18:52:56+5:302021-04-23T15:14:58+5:30
अश्विनी भावे यांचे घर मोठाले असून त्याचे इंटेरिअर देखील खूपच छान आहे. तसेच घरासमोर प्रशस्त गार्डन देखील आहे.

पाहा अश्विनी भावे यांच्या अमेरिकेतील घराची झलक
मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली.
काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं. त्यांनी काही वर्षांपूर्वी अभिनयक्षेत्रात दमदार कमबॅक केला.
अश्विनी भावे सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करतात. पण त्यातही त्या खूप चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकतात. त्यांच्या ध्यानीमनी, मांजा या अलीकडे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अश्विनी चित्रपटांमध्ये कमी काम करत असल्या तरी त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
इतकेच नाही तर सोशल मीडियाद्वारे त्या त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात असतात. अश्विनी भावे यांच्या या फोटो, व्हिडिओंमधून आपल्याला त्यांच्या घराची झलक पाहायला मिळते. त्यांचे घर मोठाले असून त्याचे इंटेरिअर देखील खूपच छान आहे. तसेच घरासमोर प्रशस्त गार्डन देखील आहे.
अश्विनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला पती आणि मुलांसोबतचे फोटो देखील शेअर करत असतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांचे पती दिसायला खूपच छान आहेत.