आश्विनी भावेने अमेरिकेत साजरी केली मकर संक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 15:57 IST2017-01-13T15:57:26+5:302017-01-13T15:57:26+5:30

आपल्या अभिनयाने अभिनेत्री आश्विनी भावे हिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही अभिनेत्री सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. त्यामुळे नुकतेच ...

Ashwini Bhave celebrated in America with Makar Sankrant | आश्विनी भावेने अमेरिकेत साजरी केली मकर संक्रांत

आश्विनी भावेने अमेरिकेत साजरी केली मकर संक्रांत

ल्या अभिनयाने अभिनेत्री आश्विनी भावे हिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही अभिनेत्री सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. त्यामुळे नुकतेच तिने अमेरिकत मकर संक्रांत साजरा करत असल्याचा व्हिडीओ सोशलमीडियावर अपलोड केला आहे. तिच्या या व्हिडीओ सोशलमीडियावर भरभरून पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ती अमेरिकेतील शांत खळखळणाºया समुद्र किनारी पतंग उडविण्याचा आनंद लुटत आहे. तिने आपल्या मुलांसह पतंग उडवून मकर संक्रांतचा सण साजरा केला आहे. त्याचबरोबर तिने सर्व चाहत्यांना या सणाच्या शुभेच्छा ही दिल्या आहेत. मात्र लवकरच तिचा ध्यानीमनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा हा चित्रपट १० फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आश्विनी भावेसोबत महेश मांजरेकरदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही हटके जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त अभिनेता अभिजीत खांडकेकर, मृण्मयी देशपांडेदेखील या चित्रपटात झळकणार आहे. ग्रेट मराठा एंटरटेन्मेंटद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. नाटककार प्रशांत दळवी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. तसेच प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री ध्यानीमनी या चित्रपटाने पुनरागमन करत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आश्विनीने यापूर्वी किस बाई किस, अशी ही बनवाबनवी, कळत नकळत, झुंज तुझी माझी, वजीर यासारखे अनेक चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची वाट प्रेक्षकांना फक्त काही दिवसच पाहावी लागणार आहे. 
















 

Web Title: Ashwini Bhave celebrated in America with Makar Sankrant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.