या कारणामुळे अशोक सराफ यांचे नाव ठेवण्यात आले होते अशोक, निवेदिता यांनीच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 16:55 IST2020-05-06T16:53:00+5:302020-05-06T16:55:02+5:30

अशोक सराफ यांचे नाव अशोक का ठेवण्यात आले यामागे एक रंजक कारण असून हे कारण निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Ashok Saraf's sister keep his name ashok due to veteran actor ashok kumar PSC | या कारणामुळे अशोक सराफ यांचे नाव ठेवण्यात आले होते अशोक, निवेदिता यांनीच केला खुलासा

या कारणामुळे अशोक सराफ यांचे नाव ठेवण्यात आले होते अशोक, निवेदिता यांनीच केला खुलासा

ठळक मुद्देनिवेदित जोशी यांनी या पोस्टसोबतच अशोक कुमार आणि अशोक सराफ यांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. अशोक सराफ यांच्या चाहत्यांना हा फोटो आणि ही पोस्ट प्रचंड आवडत आहे.

अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांना प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घ्यायला त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्यांच्या नावाबद्दलची एक खास गोष्ट आता त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनीच सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे.

अशोक सराफ यांचे नाव अशोक का ठेवण्यात आले यामागे एक रंजक कारण असून हे कारण निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. त्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली असून त्यात लिहिले आहे की, अशोकची मोठी बहीण विजया अशोक कुमारांची खूप मोठी चाहती... त्यांच्या अभिनयाने ती खूप भारावून गेली होती... धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा तिने हट्टाने त्याचं नाव अशोक कुमार ठेवायला आईला भाग पाडलं... ईश्वरानेही तथास्तु म्हटलं... अशोककुमार सराफचाच पुढे झाला अशोक सराफ झाला... चतुरस्त्र अभिनेता... आज ७२व्या वर्षीही तितक्याच ताकदीने उत्साहाने ठामपणे उभा आहे आणि अशोककुमारांना गुरू स्थानी मानतो आहे...

निवेदित जोशी यांनी या पोस्टसोबतच अशोक कुमार आणि अशोक सराफ यांचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. अशोक सराफ यांच्या चाहत्यांना हा फोटो आणि ही पोस्ट प्रचंड आवडत आहे.

अशोक सराफ यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी करण अर्जुन, यस बॉस यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत.

Web Title: Ashok Saraf's sister keep his name ashok due to veteran actor ashok kumar PSC