Bahurangi Ashok: अशोक सराफ यांचे सुपरहिट डायलॉग अन् भन्नाट मीम्स...! एकदा पाहाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 17:50 IST2022-07-03T17:49:38+5:302022-07-03T17:50:53+5:30
Ashok Saraf : नेटकऱ्यांची अशोक मामांना अनोखी मानवंदना, अशोक मामांचे काही फेमस डायलॉग, फेमस सीन घेऊन तयार केले मीम्स...

Bahurangi Ashok: अशोक सराफ यांचे सुपरहिट डायलॉग अन् भन्नाट मीम्स...! एकदा पाहाच!!
Ashok Saraf memes : अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीत अशोक मामा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) या नावाची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. अशोक मामांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. अशी ही बनवाबनवी, सगळीकडे बोंबाबोंब, घनचक्कर, वाजवा रे वाजवा या त्यांच्या चित्रपटांचा खास उल्लेख आवर्जुन करावाच लागेल. नुकताच अशोक मामांचा 75 वा वाढदिवस साजरा झाला. त्यांना मानवंदना देण्यासाठी आज अख्खी मराठी चित्रपटसृष्टी एकत्र येणार आहे. झी मराठीवर आज ‘बहुरंगी अशोक’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात अनेक मराठी कलाकार अशोक सराफ यांच्यासोबतचा काम करण्याचा अनुभव, त्यांच्यासोबतचे किस्से असं सगळं शेअर करणार आहे.
यानिमित्त झी मराठीने नेटकऱ्यांना एक भन्नाट चॅलेंज दिलं होतं. अशोक मामांचे काही फेमस डायलॉग, फेमस सीन घेऊन त्यावर मीम्स बनवण्याचं हे चॅलेंज होतं. तर या चॅलेंजला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी अशोक मामांवर बनवलेले अनेक भन्नाट मीम्स सध्या व्हायरल होत आहेत. यातले काही अफलातून मीम्स खास तुमच्यासाठी...
डॉक्टर स्ट्रेंज अन् अशोक मामा...
(zee5_marathi)
चिरमुरे खाताना मी...
(zee5_marathi)
गडचिरोलीला बदली होते तेव्हा...
(my___brain)
माझ्याकडे फक्त 70 रूपये आहेत...
आधी कुंकू लाव
(meme.marathi.maker))
अंधार दाटला भवती...
सौजन्य (manish_chavan211)