"वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा...", अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

By कोमल खांबे | Updated: June 5, 2025 10:43 IST2025-06-05T10:42:36+5:302025-06-05T10:43:04+5:30

अशोक सराफ यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लेक अनिकेत सराफ याने पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. 

ashok saraf son aniket saraf shared special post after actor received padma shri award | "वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा...", अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

"वडिलांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा...", अशोक सराफ यांच्या लेकाने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

प्रेक्षकांचे लाडके मामा असलेले अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्याआधी गेल्या वर्षी अशोक सराफ यांना राज्य सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. अशोक सराफ यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्यांदाच लेक अनिकेत सराफ याने पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. 

अशोक सराफ यांचा काल वाढदिवस होता. यानिमित्ताने अनिकेतने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबतचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली होती. "माझ्या वडिलांना महाराष्ट्र शासनाकडून सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आल्यानंतर मला त्यांचा अभिमान वाटला होता. पण, हजारो मैल दूर बसून त्यांना पद्मश्री घेताना लाइव्ह पाहिलं तेव्हा मला वाटलं नव्हतं की माझा अभिमान इतका वाढू शकतो. त्यामुळेच आजच्या या खास दिवशी माझ्या वडिलांचं केवळ आयुष्यभर कलेची पुर्नव्याख्या करण्यासाठी अभिनंदन करत नाही, फक्त त्यांचं टॅलेंट आणि कामाबद्दच्या नैतिकतेची प्रशंसा करत नाही, ते किती प्रेमळ वडील आणि उत्तम मनुष्य असल्याचं कौतुक करत नाही तर त्यासोबतच त्यांना वाढदिवसाच्याही खूप शुभेच्छा देतोय. लव्ह यू", असं अनिकेतने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


अनिकेत सराफ हा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा एकुलता एक मुलगा आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेइंडस्ट्रीत न येता त्याने करिअरसाठी वेगळं क्षेत्र निवडलं. तो शेफ असून परदेशात स्थायिक आहे. 

Web Title: ashok saraf son aniket saraf shared special post after actor received padma shri award