पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याला लेक अनुपस्थित, अशोक सराफांनी उघड केलं खरं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:52 IST2025-06-02T12:49:56+5:302025-06-02T12:52:50+5:30

लेक का गैरहजर राहिला पद्म पुरस्कार सोहळ्याला? अशोक सराफ यांनी सांगितलं खरं कारण

Ashok Saraf Reveals The Reason Why His Son Aniket Saraf Was Absent From The Padma Awards Ceremony | पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याला लेक अनुपस्थित, अशोक सराफांनी उघड केलं खरं कारण!

पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याला लेक अनुपस्थित, अशोक सराफांनी उघड केलं खरं कारण!

मराठीसह हिंदी सिनेसृष्टी आणि विविध भाषांमध्ये काम करणारे अभिनेते अशोक सराफ (ashok saraf) यांचा काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. अशोक सराफ यांची पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यावेळी उपस्थित होत्या. या आनंदाच्या क्षणी त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा व्यक्ती, म्हणजेच त्यांचा मुलगा अनिकेत सराफ मात्र गैरहजर राहिला. तो पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याला का नाही आला, याचा कारण अशोक सराफ यांनी उघड केलं आहे. 

नुकतंच अशोक सराफ यांनी 'मुंटा'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी खुलासा करत सांगितलं की, अनिकेत सध्या परदेशात असल्याने तो या सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही. त्यांनी सांगितलं, "या खास क्षणी तो माझ्यासोबत असावा अशी त्याचीही मनापासून इच्छा होती. मात्र, त्याला सुट्टी मिळू शकली नाही. त्यामुळे तो येऊ शकला नाही".

काय करतो अनिकेत?

अशोक आणि निवेदिता यांचा मुलगा अनिकेत सराफ हा एक उत्तम शेफ आहे.  तर पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण बनवण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे अनिकेत सराफ नोकरीनिमित्ताने परदेशातच राहतो. त्याचं शिक्षण फ्रान्समध्ये झालंय. अशोक सराफ यांना त्याने बनवलेली ब्राउनी खूप आवडतात. तर आई निवेदिता सराफ यांना मुलाच्या हातचा मार्बल केक आवडतो. एवढ्या मोठ्या कलाकाराचा मुलगा असूनही अनिकेतला अभिनयात, दिग्दर्शनात किंवा चित्रपटाची निर्मिती करण्यात अजिबातच रस नाहीये. त्यानं त्याची वेगळी वाट निवडली आणि त्यात यशस्वीही झालाय. 

Web Title: Ashok Saraf Reveals The Reason Why His Son Aniket Saraf Was Absent From The Padma Awards Ceremony