प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चांवरून भडकली आर्या आंबेकर, केला हा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 13:14 IST2021-09-15T13:14:21+5:302021-09-15T13:14:52+5:30
बऱ्याच कालावधीपासून आर्या आंबेकर सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा सुरू होती.

प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चांवरून भडकली आर्या आंबेकर, केला हा खुलासा
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या सिंगिंग रिएलिटी शोमधून आर्या आंबेकर हे नाव घराघरात पोहोचले. आर्याला गायनाचे धडे तिच्या घरातूनच मिळाले. आर्याने वयाच्या साडे पाच वर्षांपासून गायनाचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. आर्याने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्या आंबेकर सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे. बऱ्याच कालावधीपासून आर्या आंबेकर सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकाराला डेट करत असल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यावर तिने सोशल मीडियावर मौन सोडले आहे.
आर्या आंबेकर हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, यापूर्वी मी या चर्चांकडे दुर्लक्ष केले. मात्र नुकत्याच प्रश्नांत्तरांमध्ये मला यासंदर्भात मेजेस आला. माझ्या ओळखींच्या व्यक्तींबद्दल बोलत असल्याचे कळले त्यामुळे स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला.
आर्या आंबेकरच्या पोस्टमध्ये फोटो शेअर केला आहे. त्यात तिने म्हटले की, हॅलो. मला बरेच मेसेज आले आहेत ज्यात इंटरनेटवर असलेल्या फेक न्यूजवर मला बऱ्याच गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून कोणतीच टॅलेंट एजेंसी मॅनेज करत नाही. इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील माझे फॉलोव्हर्स ऑर्गेनिक आहेत. तसेच युट्यूबवरील सबस्क्रायबर आणि व्ह्युजदेखील ऑर्गेनिक आहे. विकतचे फॉलोव्हर्स, सबस्क्रायबर, व्ह्यूज आणि लाइक्स याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. हे माझ्या नैतिकतेत बसत नाही. मला डायरेक्ट मेल्स आणि मेसेज येतात. तसेच पार्टीसोबतचे संवाद, प्रमोशन्ससाठी आतापर्यंत मी थेट बोलले आहे. सोशल मीडियावर मला खूप प्रेम मिळते. माझ्यासाठी हे खूप मोलाचे आहेत.
आर्या आंबेकरने या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, मी नावाजलेल्या व्यक्तीला डेट करत असल्याची अफवा बऱ्याच काळापासून ऐकायला मिळत आहे. याबद्दल मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की, ते माझे मेंटॉर आहेत. अफवा सोडून मला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांचे मला कौतुक वाटते.