कलावंत करणार गरजू कलावंतांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2016 14:16 IST2016-09-05T08:46:24+5:302016-09-05T14:16:24+5:30

              ढोल-ताशांच्या तालावर बेधुंद थिरकल्याशिवाय गणेशोत्सवातील मिरवणूक पुर्ण होऊच शकत नाही. विसर्जन मिरवणूकांमध्ये ...

Artists will help the needy artists | कलावंत करणार गरजू कलावंतांना मदत

कलावंत करणार गरजू कलावंतांना मदत

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> 
            ढोल-ताशांच्या तालावर बेधुंद थिरकल्याशिवाय गणेशोत्सवातील मिरवणूक पुर्ण होऊच शकत नाही. विसर्जन मिरवणूकांमध्ये मानाचा तुरा रोवणारे आणि तमाम प्रेक्षकांचे आकर्षण म्हणजे कलाकारांचे कलावंत पथक. मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी एकत्र येऊन ३ वर्षांपुर्वी कलावंत पथकाची स्थापना केली. या पथकामध्ये सेलिब्रिटींसोबतच पडद्यामागील कलाकार देखील वादन करण्याचा आनंद घेतात. सध्या या सर्व कलाकारांना एकत्र घेऊन वादन करण्याची जबाबदारी अभिनेता सौरभ गोखले पार पाडत आहे. कलावंत पथक आणि त्यांच्या एकंदरीतच प्रवासाविषयी सौरभने सीएनएक्सशी संवाद साधला. 
 
 कलावंत हे पथक स्थापन करण्याची संकल्पना आस्ताद काळेची होती. हे आमच्या पथकाचे तिसरे वर्ष आहे. आपल्याकडे बºयाचदा डीजे चा  विरोध होताना दिसतो. त्यामुळेच आम्ही पारंपारिक वाद्यांकडे वळण्याचा विचार केला.  तसेच वादन करताना आम्ही पोलिसांच्या सर्व  नियामांचे पालन करतो. अगदी तुम्हाला आमच्या पथकात ३० ते ४० ढोलच एका वेळेस दिसतील. 
 
पथकातून मिळणाºया मानधनातून कलेशी संबंधित असणाºया गरजू कलाकारांना मदत करण्याचा यंदाचा आमचा मानस आहे. कलाकारांना पेन्शन नसते. मेडिकलची काही कलाकारांना गरज आहे. काही ज्येष्ठ कलाकार असे आहेत ज्यांची परिस्थिती फारच हालाकीची आहे. अशा कलाकारांना आम्ही मदत करणार आहोत. 
 
पुढील वर्षी मुंबई आणि कोल्हापुर याठीकाणी कलावंत पथक सुरू होणार आहे. बºयाच कलाकारांना ढोल-ताशा वाजविण्याची इच्छा असते परंतू पुण्याला येणे जमत नाही म्हणूनच आम्ही मुंबई आणि कोल्हापुरला  पुढील पर्षी पथक सूरू करतोय.
 
 प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातील सेलिब्रिटी असते. म्हणूनच कलावंत मध्ये आता कन्सट्रक्शन, हॉटेल अशा विविध हाय प्रेफाईल क्षेत्रातील लोक वादन करू शकतील. ते त्यांच्या क्षेत्रातील सेलिब्रिटीच आहेत.
 
आम्ही यंदा पहिल्या दिवशी, जंगली महाराज रोड वरील शिरोळे मंडळ, सांगवी येथील मंडळ, डांगे चौक, लक्ष्मी रोड जोगेश्वरी गणपती मंडळांसाठी वादन करणार आहोत. 
 
 सौरभ गोखले : शाळेत असल्यापासूनच मला ढोल आणि ताशा वाजवण्याची फार इच्छा होती. पण तेव्हा काही जमले नाही. मग काही वषर््ंपुर्वी मी एका मंडळात जाऊन वादन केले होते. त्यानंतर एकदा आस्ताद मला म्हणाला आपण कलाकारांसाठी पथकाची स्थापना करूयात का. मला फारच आनंद झाला आणि मी लगेचच होकार दिला. गेली तीन वर्षे आम्ही या पथकात वादन करीत आहोत. मिरवणूकीत ढोल-ताशांचे वादन करण्याचा अनूभवच फार भारी असतो.
 
श्रृती मराठे : मला ढोल-ताशा वाजवायची आवड तर होतीच. परंतू सुरूवात कुठून करायची मला समजत नव्हते. कलावंत हे पथक कलाकारांसाठी असल्याचे जेव्हा मला कळाले तेव्हा मी लगेचच त्यांच्याशी संपर्क साधला आणि मला वादन करायची इच्छा असल्याचे सांगितले. मागच्या वर्षी आम्ही पुण्यातील विसर्जन मिरवणूकीमध्ये सलग साडेचार तास उन्हात वादन केले. त्यावेळी अंगात एक वेगळीच उर्जा संचारलेली असते. एवढा जोश आमच्यात कुठूत येतो खरच समजत नाही.
 
 आस्ताद काळे : मी पुण्याचा असल्याने झोल ताशा संस्कृती फार जवळून पाहिली होती. एके दिवशी मला अचानक सुचले की आपण कलाकारांचे पथक केले तर कसे होईल. ही कल्पना मी माझ्या काही कलाकार मित्रांना सांगितली. त्यांनी लगेचच होकार कळविला आणि आम्ही पथकाची तयारी सुरू केली. पहिल्याच वर्षी आमच्याकडे ४० कलाकार होते. उन्ह, पावसात जोरदार तालमी केल्या. मिरवणूकांमध्ये वादन करण्याची मजाच और असते. 

Web Title: Artists will help the needy artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.