कलाकारांनी पडदयावर वाहिली संत विचारांची पालखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 15:05 IST2016-07-03T09:35:16+5:302016-07-03T15:05:16+5:30

    Exclusive - बेनझीर जमादार पंढरीची वारी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. विठुरायांच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकरी देहभान हरपून अखंडपणे ...

Artists walk on the padyayas to follow the thoughts of saints | कलाकारांनी पडदयावर वाहिली संत विचारांची पालखी

कलाकारांनी पडदयावर वाहिली संत विचारांची पालखी

 
Exclusive - बेनझीर जमादार

पंढरीची वारी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. विठुरायांच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकरी देहभान हरपून अखंडपणे ग्यानबा तुकाराम चा जयघोष करत या वारीमध्ये सहभागी होतात. पण आपल्या अभिनयाने या थोर संताचे विचार महाराष्ट्रातील प्रत्येक भक्तापर्यत कलाकार पोहचवत असतात. अशाच काही कलाकारांशी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीनिमित्त साधलेला संवाद. 



चिन्मय मांडलेकर: तू माझा सांगती या मालिकेतून गेली दोन वर्षे संत तुकाराम यांची भूमिका चिन्मय मांडलेकर हा अभिनेता अत्यंत सुरेखरीत्या पार पाडत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिक असणाºया संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या पालकी सोहळ््याचे दर्शन नुक तेच चिन्मयनेदेखील पत्नीसह आळंदीला उपस्थित  राहून घेतले. चिन्मय म्हणतो, या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपºयातून पालकीच्या दर्शनासाठी वारकरी पोहोचलेला असतो. दरवर्षी मला ही या ठिकाणी येण्याची ओढ लागलेली असते. पण यंदा वेळ काढून माउलीचे दर्शन घेतले आहे. मला येथे येणाºया प्रत्येक भक्तांच्या भक्तीवर विश्वास आहे. तसेच संत तुकाराम यांचे विचार माझ्या भूमिकेतून प्रत्येक भक्तांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्नदेखील असाच पुढे चालू राहीन असे आश्वासन देखील चिन्मयने लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून दिले. 



सौरभ गोखले: श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीचा मुहर्त साधत  मातीतील काही थोर व्यक्तींची कथा सांगणारी आवाज ही मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या पहिल्याच सिरीजमध्ये ज्ञानेश्वरांची गाथा सांगण्यात येणार आहे. याच मिनीसीरीज मधील संत ज्ञानेश्वरांची भूमिका अभिनेता सौरभ गोखले साकारणार आहे. याविषयी सौरभ म्हणतो, लाखो-करोंडो लोकांचे प्रेरणस्थान असणारे संत ज्ञानेश्वर यांची भूमिका करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप मोठे भाग्य आहे. ज्ञानेश्वरांची मोठी इमेज आहे. त्या इमेजनुसार ती जागणं व उभ ंकरणं हे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे मी ज्ञानेश्वरी अर्थासहित वाचायला घेतली आहे. त्यांचे श्लोक व ओव्यादेखील समजूनच भूमिका करतो. तसेच पालखीविषयी म्हणाल तर, माझ्या लहानपणापासून आजोबां व वडिलांना या गोष्टी करताना पाहिले आहे. तसेच माझे आजोबादेखील दरवर्षी वारीमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे ते संस्कृती व प्रेम घरात बालपणापासूनच मिळाले आहे.



समीधा गुरू: संत बहिणाबाई या संत तुकाराम यांच्या निस्सम भक्त होत्या. त्यांनी तुकोबांच्या दर्शनाचा ध्यास घेतला होता. यासाठी त्या रात्रदिवस तुकोबांचे अभंग म्हणत असतं. अशा या तुकोबाच्या निस्सम भक्त असलेल्या संत बहिणांबाईची भूमिका संत तुकाराम या चित्रपटात अभिनेत्री समीधा गुरू हिने साकारली होती. याविषयी समीधा म्हणते, इतक्या मोठया व्यक्तीच्या जीवनावर आधारित असणाºया चित्रपटाचा भाग होता आलं हे माझं भाग्य आहे. या भूमिकाविषयी जाणून घेण्यासाठी खूप सारी पुस्तके वाचली होता. त्यावेळी कळालं त्यांना लिहीता वाचता येत नव्हते तरी त्यांचे विचार खूप पुढारलेले व प्रबोधनात्मक होते. तसेच ज्ञानोबा व तुकोबांच्या हा सोहळयाविषयी सांगताना समीधा म्हणाली, इतक्या वर्षापासून चालू असलेल्या या कार्याशी आज ही आपण टचमध्ये आहोत. हे देखील तितकेचे विशेष आहे. ज्यावेळी आपण या पालखीमध्ये सहभागी होतो, त्यावेळी आपण त्यांच्या विचारांशी एकनिष्ठ झाल्यासारखे वाटते. 



निखिल राउत: काहे दिया परदेश, तू तिथे मी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता निखिल राउत याने ज्ञानेश्वरांची भूमिका चक्क तेलगू या चित्रपटात साकारली आहे. यावरून ज्ञानेश्वर महाराजांच्या भक्तांची प्रचिती कळते. याविषयी बोलताना निखिल म्हणाला, तेलगू या चित्रपटातून ज्ञानेश्वरांची भूमिका करायला मिळणं हे माझ्यासाठी जितकी आनंदाची गोष्ट होती तेवढीच ती आव्हानात्मक देखील होती. या चित्रपटातील डायलॉग प्रथम मराठीतून लिहून घ्यायचो. मग त्याचे उच्चार कसे करायचे याचे मार्गदर्शन दिग्दर्शकाकडून करून घ्यायचो. तसेच वारीचं स्वत:च एक महत्व आहे. देशातूनच नाही तर परदेशातूनदेखील वारी पाहायला लोक येतात. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही वारी पार पाडली जाते. या वारीमध्ये शेतकरी वर्ग देखील मोठया प्रमााणावर पाहायला मिळतो. हे शोतकरी वर्षेभर शेतात राबून महिना-दीड महिना पायी प्रवास करत विठू माउलीच्या चरणी येतात. तसेच दुष्काळानंतर ही भक्तीभावाने पेरणी झाली आहे, आता ते पीक येवू दे यासाठी साकड घालतात. प्रत्येक वारकरी संप्रदायातील एकाचं तरी वारी करण्याचं स्वप्न असतं. असा हा ग्यानबा-तुकोबांचा सोहळा एक प्रकारचा उत्साहच असतो. 



प्रमिती नरके : तू माझा सांगती या मालिकेत संत तुकाराम यांच्या पत्नीची  भूमिका साकारणारी प्रमिती नरके म्हणते, सध्या आम्ही मालिकेतदेखील वारीचे शुट करत आहोत. हे शुट खूप डोंगराळ व जंगलाच्या येथे चालू आहे. त्यामुळे वारकारी सांप्रदायाचे भक्तीमय भावना समजू शकते. हे वातावरण एकदम भारावून टाकणारे असते. हे वारीचे सगळे अनुभव मी येथे राहून देखील घेत आहे. तसेच माझे काकादेखील अनवाणी पायाने वारीमध्य सहभागी होतात. त्यामुळे बालपणापासून वारीविषयी ऐकलं आहे.मी देखील  पुढच्या वर्षी नक्की  वेळ काढून वारीला जाणार आहे. हा जो अनुभव आहे तो एकदम जगण्याच्या पलीकडचा आहे. 
                     

Web Title: Artists walk on the padyayas to follow the thoughts of saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.