ध्यानीमनी चित्रपट पाहू नका असं का म्हणतायत हे कलाकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 13:10 IST2017-01-12T13:10:36+5:302017-01-12T13:10:36+5:30

अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. महेशजींच्या अनेक चित्रपटांना यांपूर्वी प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘नटसम्राट’ या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते आणि अजूनही त्या कलाकृतीवर प्रेक्षक प्रेम करतात. मराठी सिनेसृष्टीतील उत्तम दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांचे नाव आग्रहाने घेतले जाते.

Artists say that they do not watch Dhyanamani films? | ध्यानीमनी चित्रपट पाहू नका असं का म्हणतायत हे कलाकार?

ध्यानीमनी चित्रपट पाहू नका असं का म्हणतायत हे कलाकार?

िनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर हे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. महेशजींच्या अनेक चित्रपटांना यांपूर्वी प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘नटसम्राट’ या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते आणि अजूनही त्या कलाकृतीवर प्रेक्षक प्रेम करतात. मराठी सिनेसृष्टीतील उत्तम दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. ध्यानीमनी हा महेश मांजरेकरांचा आगामी मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये महेशजींनी अभिनयासह चित्रपटाची निर्मिती पण केली आहे.
नुकतेच मराठीतल्या दिग्गज कलाकारांनी म्हणजेच अभिनेते आनंद इंगळे, भाऊ कदम, संदीप पाठक, सचिन खेडेकर, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी ‘ध्यानीमनी’  हा सिनेमा पाहू नका असे म्हंटले आहे. तुम्ही विचारात पडला असाल ना...दोन दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या दिग्गजांनी म्हणजेच खुद्द बिग बी आणि सलमान खान यांनी सिनेमाचा ट्रेलर पाहताच सोशल मिडियावरून या सिनेमाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि आज मराठीतले काही कलाकार हा सिनेमा पाहू नका असे म्हणत आहेत.  मराठी चित्रपटसृष्टीतील हे कलाकारच आता असे बोलायला लागल्यावर प्रेक्षकांनी नक्की करायचे तरी काय असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. आश्चर्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील तगडे कलाकार महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाविषीय हे कलाकार थेट असे बोलत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी असणार. आता हे काय आहे की हा प्रमोशनचा फंडा आहे हे तर तुम्हीच ठरवा. महेश वामन मांजरेकर निर्मित,  चंद्रकांत कुलकर्णी  दिग्दर्शित ‘ध्यानीमनी’ या चित्रपटात अभिनेते महेश मांजरेकर आणि अभिनेत्री अश्विनी भावे यांच्यासह मृण्मयी देशपांडे आणि अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  



Web Title: Artists say that they do not watch Dhyanamani films?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.