सैराट चित्रपटातील गाण्यांवर थिरकण्यास कलाकारांनी दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 14:10 IST2016-12-27T14:10:58+5:302016-12-27T14:10:58+5:30

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील गाण्यांनीदेखील संपूर्ण जगात झिंगाट निर्माण ...

Artists refused to throw at the songs in the film Sairat | सैराट चित्रपटातील गाण्यांवर थिरकण्यास कलाकारांनी दिला नकार

सैराट चित्रपटातील गाण्यांवर थिरकण्यास कलाकारांनी दिला नकार

गराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील गाण्यांनीदेखील संपूर्ण जगात झिंगाट निर्माण केला आहे. तसेच या चित्रपटातील आर्ची आणि परश्याची जोडीदेखील सुपरहीट ठरली आहे. या चित्रपटाने बॉक्सआॅफीसवर करोडोंचा गल्ला पार केला होता. आज ही प्रेक्षक या चित्रपटाची चर्चा करताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटानंतर  रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर एका रात्रीत प्रकाशझोतात आले होते. या दोन्ही कलाकाराना पाहण्यासाठी प्रेक्षक अक्षरश: गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले. तसेच आज ही प्रेक्षक या चित्रपटातील झिंगाट या गाण्यावर कल्ला करताना पाहायला मिळत आहे. अवघ्या देशाला याड लावणारा सैराट या चित्रपटाचे प्रदर्शनावेळी मराठी कलाकारांचादेखील झिंगाट या गाण्यावरचा नृत्य करतानाचा व्हिडीओदेखील हीट झाला होता. आता मात्र अशाच व्हिडीओसाठी कलाकारांनी नकार दिला असल्याचे समजत आहे. कारण हा चित्रपट लवकरच झी सिनेमा या वाहिनीवर दाखवला जाणार आहे. त्यामुळे सैराटच्या प्रमोशनसाठी झी टीव्हीने झीच्या कलाकारांना  झिंगाट गाण्यावर डान्स  करुन त्याच्या व्हिडीओ पाठवण्यास  सांगितलं आहे. मात्र आम्ही सैराटचं प्रमोशन का करावं, असा प्रश्न कलाकार विचारत आहे. तर काही कलाकारांनी डान्स करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता हे  कलाकार आपापल्या शोमध्ये झिंगाट गाण्यावर डान्स करणार का? झी टीव्ही कलाकारांची झिंगाट डान्ससाठी मनधरणी करणार का?  हे लवकरच प्रेक्षकांना कळेल. चला तर पाहूयात प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांचा सैराट डान्स पाहायला मिळतो का?










Web Title: Artists refused to throw at the songs in the film Sairat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.