कलाकारांचे नवीन वर्षाचे संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 10:40 IST2016-12-30T10:34:53+5:302016-12-30T10:40:39+5:30

  प्रेक्षकांच्या लाडक्या मराठी कलाकारांचे नवीन वर्षाचे संकल्प चला तर पाहूयात                   ...

Artists New Year's Resolution | कलाकारांचे नवीन वर्षाचे संकल्प

कलाकारांचे नवीन वर्षाचे संकल्प

  
प्रेक्षकांच्या लाडक्या मराठी कलाकारांचे नवीन वर्षाचे संकल्प चला तर पाहूयात
                           
                                         अभिनेत्री शिल्पा नवलकर

नवीन वर्ष; नवीन संकल्प... ही कन्सेप्ट मला मूळात पटत नाही. मूळात कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी नवीन वर्षाचीच वाट का बघायची. पण तरीही नवीन काही करायचे असा प्रश्न असेल तर मला यावर्षीपेक्षा काही तरी हटके काम करायला आवडेल जे मी यापूर्वी कधीच केलेले नाही. यंदा मी सेल्फी हे नाटक लिहिलयं... पुढल्यावर्षी मला दिग्दर्शन किंवा लेखनात नवीन प्रयोग करायला आवडेल किंवा एखाद्या मालिकेची प्रमुख बनून त्यावर काम करायला नक्की आवडेल. नवीन वर्षाचे स्वागत मी दरवर्षी न चुकता करते. आमचा एक ग्रुप आहे. या ग्रुपमधील मेंबर्स दरवर्षी एखादी थीम ठरवून त्यानुसार पार्टीचे प्लॅनिंग करतात. यापूर्वी आम्ही बॉलिवूड, वेगवेगळ्या रंगाचे ड्रेसेस अशा थीम्स ठरवून पार्टी एन्जॉय केली होती. यंदा ह्यबॅक टू स्कूलह्ण अशी थीम असून नवीन वर्षाच्या पार्टीत आम्ही सारे ग्रुप मेंबर शाळकरी विद्यार्थी बनून सहभागी होणार आहोत. यात स्कूलबॅग असेल, गणवेश, खाऊचा डबा, फळा, खडू हे सर्वच असेल. 



                                             अभिनेत्री  नम्रता गायकवाड

नविन वर्षाची सुरवात आपण सर्वच काहीना काही  संकल्प करून करतो पण ते पूर्ण होतातच असे नाही. पण मला सांगायला आनंद होतोय की मी २०१५ मध्ये दोन संकल्प केले होते ते पूर्ण झाले. एक म्हणजे गिटार शिकणे लवकरच रसिक प्रेक्षकांना व्हिडीओ अल्बम च्या माध्यमातून मी त्याची झलक दाखवणार आहे. आणि दुसरं म्हणजे दुस-या भाषेत फिल्म करण्याची इच्छा.  म्हणजे नविन वर्षात माझी मल्याळम फिल्म रिलीज होणार आहे. माझे नविन वर्षाचे सेलेब्रेशन हे नाताळ पासुनच सुरू होते. नाताळ माझ्या आवडीचा सण. बुध्दांनंतर ज्या व्यक्तिच्या विचारांनी मला प्रेरीत केले तो म्हणजे येशू. प्रेमाचा संदेश जगभर पसरविणा-या विचांरांमुळेच आयुष्यात कठीण प्रसंग आले तरीही नैराश्य येत नाही. खूप पॉझीटीव्हली मी ती सिच्युएशन हॅण्डल करू शकते. त्या दरम्यान माझी फॅमिली नेहमीच माझ्या सोबत असते. निसर्गाने मला भरभरून दिले आहे. आता माझी वेळ आहे त्याला काहितरी देण्याची. पर्यावरणाची काळजी घेत भरपूर झाडे या वर्षी मी लावणार आहे. हा माझा संकल्प नाही तर माझी अपूर्ण इच्छा आहे. येत्या वर्षात मी ती पूर्ण करणार आहे.  आपणा सर्वांना नाताळ आणि नविन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!!



                                                     अभिनेता अशोक शिंदे

यंदा नवीन वर्षात मी वाहतूकीचे नियम न मोडण्याचा संकल्प करणार आहे. मुंबई-पुणे प्रवास असो... किंवा मुंबईतीलच शुटींगचे लोकेशन गाडीने रात्री उशीरा घरी जाताना मी सिग्नल मोडणार नाही. तसेच आपल्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारतची हाक दिली आहे. याच धर्तीवर स्वच्छ मुंबई हा उपक्रम मी माझ्या पातळीवर राबविणार आहे. मी मालाडला राहतो. स्वच्छतेची मोहीम मी माझ्या भागातूनच सुरू करेन. कारण परीसर स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाचीच आहे. 31 डिसेंबरचा प्लँन मी कधी करत नाही कारण दरवर्षीच माझा प्लँन फिस्कटतो. कुठे बाहेर सेलिब्रेशनसाठी जायचे ठरवले की नेमके काही ना काही काम किंवा शुटींग लागते. अशावेळी माझ्यातला कलाकार जागा होतो आणि कामाला प्राधान्य दिले जाते. याबाबतीत मला माझे घरचे खूपच समजून घेतात. कारण ठरलेला प्रोग्रँम रद्द करताना त्यांचा नक्कीच हिरमोड होत असेल. त्यातल्या त्यात वेळ मिळेल तसा मग मी फँमिलीसोबत नवीन वर्षाचे स्वागत करतो.


 

Web Title: Artists New Year's Resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.