​आईने केलेल्या विनवणींमुळे या कलाकाराला मिळाली घाट या चित्रपटात काम करण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 15:14 IST2017-12-06T09:44:21+5:302017-12-06T15:14:21+5:30

घाट या चित्रपटात ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर राहणाऱ्या कुटुंबाची कथा सादर ...

This artist has the opportunity to work in Ghat's film due to the consent of the mother | ​आईने केलेल्या विनवणींमुळे या कलाकाराला मिळाली घाट या चित्रपटात काम करण्याची संधी

​आईने केलेल्या विनवणींमुळे या कलाकाराला मिळाली घाट या चित्रपटात काम करण्याची संधी

ट या चित्रपटात ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र वास्तव्याने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर राहणाऱ्या कुटुंबाची कथा सादर करण्यात आली आहे. आळंदी घाटाच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांची फुललेली कहाणी दाखवतानाच  जगण्यासाठी माणसाला करावी लागणारी धडपड मांडणाऱ्या ‘घाट’ ची निर्मिती सचिन जरे यांनी केली असून दिग्दर्शन राज गोरडे यांनी केले आहे. या चित्रपटात यश कुलकर्णीने मन्याची भूमिका साकारली असून त्याच्या मित्राची म्हणजेच पप्याची भूमिका साकारण्यासाठी दिग्दर्शक राज गोरडे एका मुलाच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी अनेक ऑडिशन्सही घेतल्या होत्या. पण त्यांना हवा तसा मुलगा मिळत नव्हता. एक दिवस इंद्रायणीच्या घाटावर फिरत असताना एक माऊली आपल्या मुलाला घेऊन राज यांच्याकडे आली. “काहीही करा पण माझ्या मुलाला चित्रपटात घ्या,” अशा आर्त स्वरात हात जोडून ती राज यांच्याकडे विनवणी करू लागली. विनवणी करता करता त्या माऊलीचे डोळे अश्रूंनी पाणावले. हे राज यांना पाहावले नाही आणि त्यांनी पप्याच्या भूमिकेसाठी दत्तात्रयला घेण्याचे निश्चित केले आणि अशाप्रकारे पप्याची भूमिका साकारण्याासाठी राज यांना कलाकार मिळाला. राज गोरडे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादही लिहिले आहेत. १५ डिसेंबरला ‘घाट’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पहिलाच चित्रपट असूनही दत्तात्रयने राज गोरडे, मनोज डोळस तसेच इतर सहकाऱ्यांच्या साथीने पप्याची व्यक्तिरेखा अतिशय चांगल्या प्रकारे उभी केली आहे. आपल्यालाही कोणीतरी ब्रेक दिल्यानेच आपण इथपर्यंत पोहोचू शकल्याची जाणीव राज यांना असल्यानेच त्यांनी दत्तात्रयला अभिनय येत नसूनही त्याला आपल्या चित्रपटात काम करण्साची संधी दिली असे ते सांगतात. दत्तात्रयच्या आईच्या डोळ्यांतील अश्रूंनी मी अस्वस्थ झालो होतो. पण दत्तात्रयने देखील आपल्याला मिळालेल्या संधीचे सोनं करत छान काम केले आहे असेही त्यांनी पुढे सांगितले. या चित्रपटात मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. 
कथेच्या मागणीनुसार या चित्रपटात ज्ञानोबा माउलींचा एक गजर असून हा गजर वैभव देशमुख यांनी लिहिला असून प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा यांनी स्वरबद्ध केला आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर साबन्नवार यांनी साऊंड डिझाइनिंगचे काम पाहिले आहे.

Also Read : घाट चित्रपटाची पहिली झलक रसिकांच्या भेटीला

Web Title: This artist has the opportunity to work in Ghat's film due to the consent of the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.