​सायली पंकजच्या घरी झाले नन्ही परीचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 15:24 IST2017-09-13T09:54:05+5:302017-09-13T15:24:05+5:30

एका प्रसिद्ध गायिकेच्या घरी नुकतेच एका नन्ही परीचे आगमन झाले असून तिनेच ही बातमी सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना सांगितली ...

Arriving in the house of Sayali Pankaj | ​सायली पंकजच्या घरी झाले नन्ही परीचे आगमन

​सायली पंकजच्या घरी झाले नन्ही परीचे आगमन

ा प्रसिद्ध गायिकेच्या घरी नुकतेच एका नन्ही परीचे आगमन झाले असून तिनेच ही बातमी सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना सांगितली आहे. तिच्या या बातमीवर तिच्या फॅन्सना तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत.
सायली पंकजने सांग ना रे, मँगो डॉली, स्वप्न चालून आले यांसारखी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. तिचे टिक टिक वाजते हे गाणे तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तिच्या व्यवसायिक आयुष्याप्रमाणे सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप खूश आहे. कारण तिच्या आयुष्यात नुकत्याच एका छोट्याशा परीचे आगमन झाले आहे. सायलीनेच ही बातमी फेसबुक या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगितली आहे. तिने काही दिवसांपूर्वी प्रेग्नसी फोटोशूट केले होते. याच फोटो शूटमधील एक फोटो फेसबुकला पोस्ट करून तिने ही गोड बातमी सगळ्यांना दिली आहे. या फोटोसोबत तिने मला मुलगी झाली असे लिहिले आहे. सायलीने तिची ही गोड बातमी सांगितली असली तरी अद्याप तिने तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. तिची मुलगी कशी दिसत असेल याची तिच्या फॅन्सना उत्सुकता लागलेली आहे.
सायलीचे लग्न पंकज पडघम यांच्याशी झाले असून ते प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहेत. सायली आणि पंकज हे एकाच क्षेत्रात असून ते त्यांच्या आयुष्यात आलेल्या या नव्या पाहुण्यामुळे खूपच खूश आहेत. सायली आणि पंकज यांनी १४ फेब्रुवारी 2013ला प्रेमविवाह केला होता. एका वर्तमानपत्राशी बोलताना सायलीने सांगितले आहे की, आम्ही दोघे तसेच आमच्या घरातील सगळेच प्रचंड खूश आहोत. आमच्या घरात आलेल्या या चिमुकलीचे स्वागत कसे करायचे याचाच सध्या सगळे विचार करत आहेत. तिच्या स्वागताच्या तयारीला सगळे जोमाने लागले आहेत. 
सायली पंकजने फेसबुकला पोस्ट केलेल्या या फोटोला हजाराहून अधिक लोकांनी लाइक केले आहे तर अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता सायली तिच्या मुलीचा फोटो पोस्ट कधी करते हे आपल्याला लवकरच कळेल. 

Also Read : मराठी अभिनेत्याच्या घरी आली नन्ही परी 

Web Title: Arriving in the house of Sayali Pankaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.