फॅँड्रीच्या कलाकाराला घरफोडी प्रकरणात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 19:04 IST2016-06-28T13:34:33+5:302016-06-28T19:04:33+5:30
फॅँड्री चित्रपटासह अनेक शॉर्टफिल्ममध्ये भूमिका बजावणाऱ्या योगेश चौधरीला घरफोडी गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. क्वॉर्टर गेट सोसायटीमधील एका वकिलाच्या ...

फॅँड्रीच्या कलाकाराला घरफोडी प्रकरणात अटक
फ ँड्री चित्रपटासह अनेक शॉर्टफिल्ममध्ये भूमिका बजावणाऱ्या योगेश चौधरीला घरफोडी गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. क्वॉर्टर गेट सोसायटीमधील एका वकिलाच्या घरातील चोरीचा तपास सुरू असताना काही तरुण पिंपरीत सोन्याचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि योगेशसह पाच जणांना अटक केले. त्यांच्याकडून तब्बल १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात ६१५ ग्रॅमचं सोने (यात अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने) १० तोळे वजनाची सोन्याची लगड, त्याचप्रमाणे ४९६ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू (यात १३ नाणी) १३ चमचे, लक्ष्मीची मूर्ती, कॅमेरा, दोन मनगटी घड्याळे, सोने वितळवण्यासाठी वापरलेली मशीन पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
योगेशने फँड्री चित्रपटातत शाळेतल्या एका विद्याथ्यार्ची छोटीशी भूमिका केली होती. विशेष म्हणजे जब्याच्या भूमिकेसाठी आपली आॅडिशन झाल्याचंही तो म्हणतो. याशिवाय तंबाखु विरोधी प्रतिज्ञा आणि प्रिझम या लघुपटातही त्याने काम केलं आहे. अर्धवट राहिलेलं शिक्षण आणि वाईट संगत, पैशाच्या हावेतून तो गुन्ह्यात अडकल्याचं त्याने सांगितलं.