अरमान मलिक मराठीत आवाज पोहचविण्यासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 12:53 IST2016-05-08T07:22:18+5:302016-05-08T12:53:10+5:30
बॉलीवुडचे दिग्गज गायक सोनू निगम, विशाल, श्रेया घोषाल, शंकर महादेवन यांच्या पावलावर पाऊल टाकत मै हू हिरो तेरा या ...

अरमान मलिक मराठीत आवाज पोहचविण्यासाठी सज्ज
ब लीवुडचे दिग्गज गायक सोनू निगम, विशाल, श्रेया घोषाल, शंकर महादेवन यांच्या पावलावर पाऊल टाकत मै हू हिरो तेरा या गाण्याने तरूणांच्या मनावर आधिराज्य गाजविणारा अरमान मलिक आता, मराठी इंडस्ट्रीमध्ये आपला आवाज पोहोचविण्यासाठी सज्ज झाला आहे. जोश, उत्साह, वेगळेपण जपण्याचा अट्टाहास, बदल घडवण्याची इच्छा आणि त्यादिशेने उठणारी पाऊले अशी ताकदशीर असणारे व्यक्तीमहत्व म्हणजे यूथ. असाच तरूणांनी एकत्रित येवून केलेला समाज जागृतीवर आधारित असणाºया यूथ या चित्रपटामध्ये मलिक घराण्याचा अरमान मलिक यांने आपला सुरेख आवाज दिला आहे. राकेश कुडाळकर दिग्दर्शित युथ या चित्रपटाची कथा व पटकथा विशाल चव्हाण आणि युग यांनी या लिहिली आहे. तर या चित्रपटात नेहा महाजन, अक्षय वाघमारे, अक्षय म्हात्रे, मीरा जोशी, शशांक जाधव, केतकी नारायण, या यंग ब्रिगेडबरोबर विक्रम गोखले आणि सतिश पुळेकर हे अनुभवी कलाकारांचा समावेश आहे.