आर्चीच्या दाक्षिणात्य सैराटचा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 13:42 IST2017-02-26T08:12:57+5:302017-02-26T13:42:57+5:30
आपल्या बिनधास्त अंदाजाने सगळ्यांच्या मनात भरलेली रिंकू राजगुरु म्हणजेच आर्चीने या चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना याड लावण्यासाठी सैराट सज्ज झाल्याचं दिसत आहे.
.jpg)
आर्चीच्या दाक्षिणात्य सैराटचा ट्रेलर प्रदर्शित
ागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने संपुर्ण महाराष्ट्राला याड लावणा-या सैराटचा कन्नड रिमेक असलेला हा मनसु मल्लिगे चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. आपल्या बिनधास्त अंदाजाने सगळ्यांच्या मनात भरलेली रिंकू राजगुरु म्हणजेच आर्चीने या चित्रपटातही मुख्य भूमिका निभावली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना याड लावण्यासाठी सैराट सज्ज झाल्याचं दिसत आहे.
आपल्या मराठी सैराटमध्ये असलेलं संगीत काही बदल न करता तसंच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा झिंगाट होताना दिसतील. काही दिवसांपुर्वी सैराटच्या कन्नड व्हर्जनमधील झिंगाटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. भाषा कळत नसली तरी त्यातील भावना लोकांना कळत असल्याने ठेका धरण्यामध्ये काही अडचण येताना दिसत नाही.
सध्या कन्नड भाषेतील सैराटची फार चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटांतील गाण्यांचे आॅडिओ लॉन्च करण्यात आले आहेत. अगदी कमी वेळात या गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. मनसु मल्लिगे या चित्रपटाची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश करणार आहे. सैराटच्या दाक्षिणात्य भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने घेतले असून हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. हा चित्रपट याआधि फ्रेबुवारीमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आर्चीच्या दहावीच्या परिक्षेमुळे या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मग चला तर पाहूयात हा दाक्षिणात्य सैराटदेखील प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी होतो का?