आर्ची म्हणते.....आई तुला काय झालं रडायला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 23:14 IST2016-05-07T17:44:14+5:302016-05-07T23:14:14+5:30

जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार भेटल्यावर खाली उतरून जाग्यावर गेले तर आई-बाबांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी पाहील. आईला म्हणाले. 'आई ...

Archie says ... Mother, do you cry? | आर्ची म्हणते.....आई तुला काय झालं रडायला?

आर्ची म्हणते.....आई तुला काय झालं रडायला?

व्हा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार भेटल्यावर खाली उतरून जाग्यावर गेले तर आई-बाबांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी पाहील.
आईला म्हणाले. 'आई तूला काय झालं रडायला ? 
आई म्हणते 'तू लहानपणी खुप ञास द्यायची मला,पण ञास देणारी मुलेच पुढे आई-वडीलांचे नाव मोठे करतात आणि आजचा तो क्षण आम्ही पाहत आहोत म्हणून आपोआप डोळ्यातून पाणी येत आहे'
खरच खुपच भाग्याचा क्षण होता तो माझ्यासाठी, ज्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दही नाहीत. 
माझे ऑडीशन झाल्यानंतर मी जेव्हा नागराज दादाच्या घरी गेले तेव्हा तिथे अजय-अतूल बसलेले होते, नागराज दादाने माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले ही आपल्या चिञपटाची 'आर्ची'. 
तेवढ्यात अजयदादा म्हणाला 'ही पोरगी काम करणार होय हिरोईनचे ? 
आणि आत्ता माझे काम बघून अजयदादा पण म्हणतो आर्चे तू खुप सुंदर काम केलस बघ .
मी दिसत जरी कशी असले तरी मि दिलेले काम व्यवस्थित करू शकते.
या सगळ्या प्रवासात माझ्या सोबत खंबीरपणे राहिलेला नागराज दादा काल सोबत नव्हता याचे फार दुःख झाले. खर तर हा पुरस्कार ही त्याचीच देणं आहे.
नागराज दादासाठी कवी वामनदादा यांची एक ओळ..
''होतो मातीत दडलेला होतो मातीत पडलेला
माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने...''
- रिंकू राजगुरू

Web Title: Archie says ... Mother, do you cry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.