आर्ची-परशा निवडणूक आयोगाचे ब्रॅँड अॅम्बेसेडर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 12:22 IST2017-01-19T12:22:43+5:302017-01-19T12:22:43+5:30
सध्या संपूर्ण राज्यात निवडणुकांची गडबड सुरू झालेली दिसत आहे. या सर्व गडबडीत मात्र नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी ...

आर्ची-परशा निवडणूक आयोगाचे ब्रॅँड अॅम्बेसेडर
स ्या संपूर्ण राज्यात निवडणुकांची गडबड सुरू झालेली दिसत आहे. या सर्व गडबडीत मात्र नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकराने एक शक्कल लढविली आहे. त्यांनी चक्क आर्ची आणि परशा यांना निवडणूक आयोगाचे ब्रॅँड अॅम्बेसेडर बनविले आहे. आता ही जोडी सैराटसाठी नाही तर निवडणूकांसाठी फ्लेक्स आणि बॅनरवर झळकणार आहे. या जाहिरातींमधून आर्ची आणि परशा नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत. आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पाडून घेतले आहे. आज ही तिचा प्रत्येक डायलॉग लहानांपासून ते मोठयापर्यतच्या ओठी निघताना पाहायला मिळत आहे. तर परशाने ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आठ महिने झाले असले तरी, आज ही या चित्रपटातील कलाकार, गाणी, डायलॉग तितकेच हीट असल्याचे पाहायला मिळत आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या दोघांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटानंतर रिंकू म्हणजेच आर्चीने नुकतेच दाक्षिणात्य चित्रपटाचे चित्रिकरण केले आहे. तिचा दाक्षिणात्य सैराट चित्रपटाचा रिमेक प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तर परशा म्हणजेच आकाश हा एफ्यू चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. मराठी इंडस्ट्रीचे तगडे दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटात आकाशसोबत सत्या मांजरेकर, संस्कृती बालगुडे, मधुरा देशपांडे आदि कलाकार झळकणार आहे. त्यामुळे सैराट चित्रपटानंतर या दोघांचीही लॉटरी लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. आता ही जोडी राज्यातील मतदारांना मतदानासाठी जागृत करणार आहे.