अन्वेषा दत्तागुप्ता गाणार बबन या मराठी चित्रपटासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 16:09 IST2017-01-03T16:09:19+5:302017-01-03T16:09:19+5:30
प्रेम रतन धन पायो या चित्रपटातील जलते दिये हे गाणे रसिकांना प्रचंड आवडले होते. या गाण्याची गायिका अन्वेषा दत्तागुप्ता ...

अन्वेषा दत्तागुप्ता गाणार बबन या मराठी चित्रपटासाठी
प रेम रतन धन पायो या चित्रपटातील जलते दिये हे गाणे रसिकांना प्रचंड आवडले होते. या गाण्याची गायिका अन्वेषा दत्तागुप्ता लवकरच एका मराठी चित्रपटासाठी गाणार आहे. अन्वेषाने आतापर्यंत अनेक हिंदी, बंगाली, कन्नड आणि तमीळ चित्रपटात गाणी गायली आहेत. मराठी चित्रपटासाठी गाण्याची अन्वेषाची ही पहिलीच वेळ असणार आहे. मराठीत गाण्यासाठी सध्या ती खूप उत्सुक आहे.
भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडा या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाचे कौतुक समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनीही केले होते. या चित्रपटानंतर आता भाऊराव बबन हा त्यांचा दुसरा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आल्यापासूनच या चित्रपटाविषयी सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. या चित्रपटावर सध्या त्यांचे काम सुरू असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ते लवकरच सुरुवात करणार आहेत.
![baban marathi movie]()
बबन या चित्रपटांच्या गाण्यांवर सध्या भाऊराव आणि त्यांची टीम काम करत आहे. या चित्रपटातील एक गाणे अनेक हिंदी चित्रपटात गाणी गायलेली गायिका अन्वेषा दत्तागुप्ता गाणार आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग लवकरच यशराज स्टुडिओत होणार आहे. याविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊसाहेब सांगतात, "बबन या चित्रपटातील गाण्यासाठी अन्वेषा अगदी योग्य असल्याचे आमच्या सगळ्यांचे एक मत होते. मराठी चित्रपटासाठी गाण्याची तिची ही पहिलीच वेळ असल्याने ती यासाठी खूपच मेहनत घेत आहे. तिला मराठी येत नसली तरी प्रत्येक उच्चार ती आमच्याकडून समजावून घेत आहे. रसिकांना तिचे हे गाणे प्रचंड आवडेल याची मला खात्री आहे."