अनुराग कश्यपनंतर दिग्दर्शक सचिन कुंदलकरही देणार रसिकांना 'गुलाबजाम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 12:58 IST2017-03-31T06:35:40+5:302017-03-31T12:58:02+5:30
काही दिवसांपूर्वीच गुलाबजामून नावाच्या हिंदी सिनेमाची घोषणा दिग्दर्शक अनुराग कश्यपने केली होती. विशेष म्हणजे यांसिनेमात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या ...

अनुराग कश्यपनंतर दिग्दर्शक सचिन कुंदलकरही देणार रसिकांना 'गुलाबजाम'
क ही दिवसांपूर्वीच गुलाबजामून नावाच्या हिंदी सिनेमाची घोषणा दिग्दर्शक अनुराग कश्यपने केली होती. विशेष म्हणजे यांसिनेमात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघांच्याही मुख्य भूमिका असून रोमँटीक कॉमेडी सिनेमा असल्याचे अनुराग कश्यप यांनी सांगितले होते. त्याच पाठोपाठ आता मराठीत 'गुलाबजाम' याच नावाने सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे.'गुलाब जाम' या मराठी सिनेमाची आज घोषणा करण्यात आली आहे. नुकतेच अभिनेता सिध्दार्थ चांदेकरने या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर ''आमच्या रेसिपीला सुरूवात झाली'' असे कॅप्शन दिलेले पोस्टर पोस्ट केले आहे.विशेष म्हणजे सिनेमात अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी एक कपल एक कपल म्हणून झळकणार असल्याचे बोलेल जात आहे.त्यामुऴे पहिल्यांदाच सोनाली कुलकर्णी आणि सिध्दार्थ चांदेकर ही जोडी रोमँटीक भूमिकेत पाहायला मिळू शकते असे कळतंय.हा सिनेमा सचिन कुंदलकर दिग्दर्शित करत असून पुण्यात गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत सिनेमाच्या शूटिंगला सुरूवातही करण्यात आली आहे.सध्या मराठीत वेगवेगळे प्रयोग होत आहेत.त्यानुसार थाटकुडम ब्रिज या म्युझिक बँडचे म्युझिक सिनेमात ऐकायला मिळणार आहे.'वजनदार' सिनेमात सचिन कुंदलकरने सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या अभिनेत्रींना घेऊन सिनेमात वेगवेगळे प्रयोग केले होते.रसिकांकडूनही 'वजनदार' सिनेमाचे खूप कौतुक करण्यात आले होते.त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सचिन कुंडलकर त्याच्या आगामी सिनेमात रसिकांना देणारा 'गुलाबजाम' नक्कीच मनोरंजनाचा बार उडवून देणारा ठरणार आहे हे मात्र नक्की.
Also Read:कोणता मराठी चित्रपट रॉकऑनवर पडला भारी ?
Also Read:कोणता मराठी चित्रपट रॉकऑनवर पडला भारी ?