'या' प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी कपलचा मोठा निर्णय; १२ वर्षांच्या संसारानंतरही बाळ नकोय! कारण की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:34 IST2025-10-30T09:34:04+5:302025-10-30T09:34:41+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' जोडप्याला का नकोय मुलं ? कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

'या' प्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी कपलचा मोठा निर्णय; १२ वर्षांच्या संसारानंतरही बाळ नकोय! कारण की...
सध्या नो किड्स ही जीवनशैली अधिक लोकप्रिय होत आहे. यामध्ये दाम्पत्यं करिअरवर लक्ष केंद्रित करतात आणि मुलं जन्माला न घालण्याचा निर्णय घेतात. आर्थिक स्वातंत्र्य, करिअरची प्रगती आणि वैयक्तिक आनंदावर भर देणारी ही जीवनशैली विशेषत: युवक आणि तरुण पिढीत अधिक स्वीकारली जात आहे. अनेक मराठी जोडप्यांनी मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतलाय. या यादीत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि तिची पती अभिषेक जावकर, अभिनेता अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री अंजली कुलकर्णी,अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेते संदेश कुलकर्णी यांची नावे येतात. मुलं जन्माला न घालण्याच्या निर्णयामागे प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत. याच यादीत आणखी एक नावाचा समावेश झाला आहे.
ते म्हणजे मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील एक लोकप्रिय जोडपं अनुजा साठे आणि सौरभ गोखले. या दोघांच्या लग्नाला तब्बल १२ वर्षे झाली आहेत. मात्र, लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही या सेलिब्रिटी जोडप्याने मूल न होऊ देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. अनुजा साठे आणि सौरभ गोखले यांनी मिळून घेतलेल्या या निर्णयामागे केवळ एकच नव्हे, तर दोन अत्यंत स्पष्ट आणि भावनिक कारणे आहेत.
अनुजा साठे आणि सौरभ गोखले हे दोघेही प्राणीप्रेमी म्हणून ओळखले जातात. अनुजाने एका मुलाखतीत स्पष्ट केले की, त्यांच्या घरी असलेले पाळीव कुत्रे हेच त्यांचे मूल आहेत. अनुजा म्हणाली होती, "आम्हाला प्राणी खूप आवडतात. आमच्याकडे चार कुत्रे आहेत. अजून चार असतील तरी हरकत नाही, आम्ही त्यांना मुलंच मानतो. आम्ही त्यांचा मुलांसारखा सांभाळ करतो".
अनुजानं सांगितलं होतं की, तिच्यामध्ये मातृत्वाची भावना निश्चितच आहे, परंतु तिला मुलांपेक्षा प्राण्यांप्रती ही भावना जास्त तीव्रतेने जाणवते. बाळ न होण्याचा निर्णय घेण्यामागे अनुजाने दुसरे मोठे कारण दिले होते. ते म्हणजे वाढती महागाई आणि भविष्यातील मुलाचे संगोपन. अनुजा जुन्या काळाबद्दल बोलताना म्हणाली की, "आपण भाग्यवान होतो कारण शिक्षणासाठी तेव्हा फार खर्च करावा लागला नाही. मात्र, आज वेगाने गोष्टी महाग होत आहेत. मुलाला या जगात आणून सगळ्या गोष्टींसाठी तडजोड करणं मला योग्य वाटत नाही".