आणखी एका हिंदी शोमध्ये 'सैराट'चा झिंगाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 12:59 IST2016-06-21T07:29:18+5:302016-06-21T12:59:18+5:30
सैराट सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ...

आणखी एका हिंदी शोमध्ये 'सैराट'चा झिंगाट
tyle="font-family: 'arial unicode ms', sans-serif; color: rgb(70, 70, 70); line-height: 26px; font-size: 16px; padding-bottom: 6px;">
सैराट सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर द कपिल शर्मा शो'नंतर आणखी एका हिंदी शोमध्ये झळकले. मराठी चित्रपटसृष्टीत विक्रमी उत्पन्न मिळवून नवा विक्रम प्रस्थापित करणारा ‘सैराट’ हा चित्रपट आणि त्यातील ‘आर्ची व परशा’ ही जोडी अर्थात रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. कपिल शर्मा याच्या ‘कॉमेडी शो’मध्ये येऊन गेल्यानंतर ही जोडी आता हिंदीतील ‘सो यु थिंक यू कॅन डान्स’ या रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘सैराट’ चित्रपटाने केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनाही चित्रपटगृहाकडे खेचून आणले आहे. ‘सैराट’मधील ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्याने तर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रिंकू व आकाश यांना नवीन मराठी चित्रपटही मिळाले आहेत. एकूणच ही जोडी सध्या ‘हिट’ ठरली आहे. या दोघांसह ‘सैराट’चा दिग्दर्शक नागराज मंजुळे व अन्य चमू हिंदीतील कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाला होता. आता त्याच्या पुढचे पाऊल टाकत रिंकू व आकाश ही जोडी आणखी एका हिंदी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत आहे. ‘अॅण्ड टीव्ही’वर ‘सो यु थिंक यू कॅन डान्स’ हा रिअॅलिटी शो असून त्यामध्ये या जोडीने ‘सैराट’मधील काही संवाद म्हणून दाखविले आहेत. विशेष म्हणजे माधुरी दीक्षितच्या ‘देवदास’मधील प्रसिद्ध संवादही सादर केला आहे. रिंकू ‘चंद्रमुखी’ तर आकाश ‘देवदास’ झाला आहे. रिंकू आकाशला ‘क्यो पिते हो जब बर्दाश नहीं होती’? असा प्रश्न विचारते व आकाश त्यावर तिला ‘इसलिए पिता हूं ता की तुम्हे बर्दाश कर सकू’ असे उत्तर देतो. याच कार्यक्रमात रिंकू व आकाश ने ‘याड लागलं’ व ‘सैराट झालं जी’ या दोन गाण्यांवर नृत्यही केलं आहे. कार्यक्रमाचे प्रसारण रविवारी रात्री साडेआठ वाजता ‘अॅण्ड टीव्ही’वर होणार आहे.