लिव्ह इन रिलेशनशीपवर भाष्य करणार‘कंडीशन्स अप्लाय’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 10:49 IST2017-05-16T05:05:50+5:302017-05-16T10:49:12+5:30
सतत नव्या ट्रेंड आणि फॅशनच्या शोधात असणारी आजची युवा पिढी लिव्ह इन रिलेशनचा ट्रेंड स्वखुशीने स्वीकारताना दिसत आहे. तरुणांच्या ...

लिव्ह इन रिलेशनशीपवर भाष्य करणार‘कंडीशन्स अप्लाय’
स त नव्या ट्रेंड आणि फॅशनच्या शोधात असणारी आजची युवा पिढी लिव्ह इन रिलेशनचा ट्रेंड स्वखुशीने स्वीकारताना दिसत आहे. तरुणांच्या याच मानसिकतेवर भाष्य करणारा ‘संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन’ प्रस्तुत डॉ. संदेश म्हात्रे निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित कंडीशन्स अप्लाय- अटी लागू या आगामी मराठी सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे सुबोध भावे, दीप्ती देवी, संगीतकार अविनाश-विश्वजीत यांच्यासह चित्रपटाच्या संगीत विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. कंडीशन्स अप्लाय- अटी लागू हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणाऱ्या दिप्ती देवी ने ‘चित्रपटाची प्रोसेस एन्जॉय करत असतांना मी अविनाश-विश्वजीत यांच्यासोबतचं कामही एन्जॉय केलं’ अशा भावना व्यक्त केल्या. चित्रपटाचे संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी प्रेमाचे रंग उलगडून दाखवणारी गोष्ट आणि त्याला अनुसरून असलेली गाणी कंपोज करण्याची संधी मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या टीमचे आभार मानले.कॉर्पोरेट जगात वावरणाऱ्या अभय आणि स्वरा यांची फुलत जाणारी प्रेमकहाणी आणि त्याला साजेशी गीतं या चित्रपटात आहेत. या चित्रपटात चार वेगवेगळ्या जॉनर ची गाणी आहेत. विश्वजीत जोशी यांनी शब्दबद्ध केलेलं ‘काही कळेना’ हे गीत तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत याने गायले आहे. ‘तुझेच भास’ हे संगीता बर्वे लिखित हृदयस्पर्शी गीत फराद भिवंडीवाला आणि प्रियंका बर्वे यांनी गायले आहे. जय अत्रे लिखित ‘मै तो हारी’ हे विरह गीत फराद भिवंडीवाला, आनंदी जोशी, आणि विश्वजीत जोशी यांनी गायले आहे. तरुणीला ज्या रॅप संगीताने वेड लावले आहे असं एक रॅप गीत ‘मार फाट्यावर’ ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून आनंद शिंदे आणि गंधार कदम यांनी ते गायले आहे.'लिव्ह इन'च्या ट्रेंड वर भाष्य करणाऱ्या कंडीशन्स अप्लाय- अटी लागू या चित्रपटात सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, विनीत शर्मा, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, डॉ. उत्कर्षा नाईक, अतिशा नाईक या कलाकारांच्या भूमिका आहेत.