अंकुश चौधरी नव्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 15:47 IST2017-08-16T10:17:50+5:302017-08-16T15:47:50+5:30
चंदेरी दुनिया म्हणजेच चित्रपटसृष्टी, ज्याचे आकर्षण आपणा सर्वांना असते. या दुनियेतील कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत ...

अंकुश चौधरी नव्या भूमिकेत
च देरी दुनिया म्हणजेच चित्रपटसृष्टी, ज्याचे आकर्षण आपणा सर्वांना असते. या दुनियेतील कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात. प्रेक्षकांनासुद्धा या सिनेसृष्टीचे जणू वेडच लागलेले असते. त्यामुळे आपल्या आवड़त्या कलाकारांना आपल्याला कशा प्रकारे भेटता येईल यासाठी चाहते नेहमीच धडपड करत असतात.
पीआर आणि डिजिटल मार्केटिंग कंपनी हे चाहते आणि कलाकारांमध्ये दुव्याचे काम करत असतात. त्यांच्या मार्फत लोकांना आपला आवडता स्टार काय करतो हे इत्यंभूत समजत असते. अशाच एका पीआर आणि डिजिटल मार्केटिंग कंपनीची नुकतीच एंट्री झालेली आहे. या कंपनीचे नाव आहे "THE SOCIAL HOOT असे आहे." या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीशी मराठी सिनेमामधील सुपरस्टार अंकुश चौधरी जोडला गेला आहे. अंकुशसाठी हे क्षेत्र खूपच नवीन असले तरी तो सध्या हे सगळे एन्जॉय करत आहे.
अंकुशने दुनियादारी, डबल सीट यांसारख्या चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्याचा गुरू आणि ती सध्या काय करते हे चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाले होते. ती सध्या काय करते या त्याच्या चित्रपटाला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता तो प्रेक्षकांना देवा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील त्याचा लूक खूप वेगळा असणार असून या चित्रपटात तो एका वेगळ्याच भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात तो प्रत्येकाला मदत करण्यास तत्पर असणाऱ्या एका व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव देवा असून तो सगळ्यांचा लाडका दाखवला जाणार आहे.
Also Read : अंकुश चौधरी देवा या चित्रपटात दिसणार या भूमिकेत