अंकुश चौधरीची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 07:15 IST2019-07-28T07:15:00+5:302019-07-28T07:15:00+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

अंकुश चौधरीची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पहा तिचे फोटो
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अंकुशची पत्नी दिपा परब ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अंकुश आणि दिपाने १९९५ साली लग्न केलं आणि आता त्यांना प्रिन्स मुलगा आहे.
दिपा आणि अंकुश यांचा २३ नोव्हेंबर रोजी साखरपुडा पार पडला. अंकुश आणि दिपा एकमेकांना कॉलेज दिवसांपासून ओळखतात. अंकुश आणि दिपा हे एमडी म्हणजे महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी. आणि त्या दोघांचं प्रेम एकच आणि ते म्हणजे ऍक्टिंग आणि थिएटर. लग्नापूर्वी अंकुश आणि दिपा एकमेकांना १० वर्ष डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न केलं.
अंकुश चौधरी, केदार शिंदे आणि भरत जाधव ही तेव्हाची लोकप्रिय तिकडी. केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे.
त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तसेच दिपाचा प्रसाद ओक आणि सुबोध भावे सोबतचा क्षण हा सिनेमा अधिक लोकप्रिय ठरला.
लग्नाला १३ वर्षे झाल्यानंतरही या दोघांचा संसार सुखाचा सुरू आहे. दिपा पूर्णपणे घराची जबाबदारी सांभाळत असून ती सिनेइंडस्ट्रीपासून लांब आहे.
तिने अंकुशला दिलेला पाठिंबा हा खरंच कौतुकास्पद आहे.
अंकुश शेवटचा ती सध्या काय करते या चित्रपटात झळकणार आहे.