अंकुश चौधरीचा बायकोबरोबर रोमँटिक डान्स, 'बाईपण भारी देवा'च्या सक्सेस पार्टीत कपलचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 11:38 IST2023-07-20T11:36:51+5:302023-07-20T11:38:11+5:30

अंकुश चौधरी आणि दीपा परब या गोड जोडीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

ankush chaudhari romantic dance with wife deepa parab at success party of baipan bhari deva movie | अंकुश चौधरीचा बायकोबरोबर रोमँटिक डान्स, 'बाईपण भारी देवा'च्या सक्सेस पार्टीत कपलचीच चर्चा

अंकुश चौधरीचा बायकोबरोबर रोमँटिक डान्स, 'बाईपण भारी देवा'च्या सक्सेस पार्टीत कपलचीच चर्चा

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या मराठी सिनेमाने अक्षरश: 50 कोटींचा टप्पा पार केलाय. सहा बहिणींची कथा असलेल्या या सिनेमाने प्रत्येक बाईवर एक वेगळीच छाप सोडली आहे. त्यामुळेच कित्येक बायका ग्रुप ग्रुपने थिएटरमध्ये जात आहेत. सिनेमा आजही हाऊसफुल सुरु आहे. हे यश पाहता सिनेमाच्या टीमने काल सक्सेस पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीत सिनेमाचे सर्वच कलाकार सहभागी झाले होते. यावेळी अंकुश चौधरी आणि दीपा परब या गोड जोडीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) आणि दीपा परब (Deepa Parab) ही मराठीतली ऑलटाईम हिट जोडी आहे. दोघं याही वयात कमालीचे फीट आणि यंग दिसतात. काल 'बाईपण भारी देवा'च्या सक्सेस पार्टीत अंकुश आणि दीपा या जोडीने रोमँटिक डान्स केला. त्यांना डान्स करताना पाहून उपस्थितीत सर्वांच्याच नजरा या जोडीवर खिळल्या होत्या. एकीकडे बाईपण भारी देवाचं यश आणि दुसरीकडे 'दुनियादारी' सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे दोघांसाठी हा आनंदाचा क्षण होता जो त्यांनी खास अंदाजात सेलिब्रेट केला. त्यांचा डान्स 'लोकमत फिल्मी'ने कॅमेऱ्यात कैद केला आहे.

'बाईपण भारी देवा'मध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, आणि दीपा परब यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. प्रत्येक महिलेला आपलासा वाटणारा असा हा सिनेमा आहे. या सहा बायकांनी थिएटर अक्षरश: दणाणून सोडलं आहे.

Web Title: ankush chaudhari romantic dance with wife deepa parab at success party of baipan bhari deva movie