'नवा गडी नवं राज्य'फेम अनिता दाते,सागर देशमुख, पुष्कराज चिरपुटकरचं त्रिकूट रंगमंचावर घालणार धूमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:22 PM2023-08-08T12:22:47+5:302023-08-08T13:08:06+5:30

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनिता दाते.

Anita Date, Sagar Deshmukh, Pushkarraj Chirputkar new drama kirkol navre will be on stage | 'नवा गडी नवं राज्य'फेम अनिता दाते,सागर देशमुख, पुष्कराज चिरपुटकरचं त्रिकूट रंगमंचावर घालणार धूमाकुळ

'नवा गडी नवं राज्य'फेम अनिता दाते,सागर देशमुख, पुष्कराज चिरपुटकरचं त्रिकूट रंगमंचावर घालणार धूमाकुळ

googlenewsNext

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनिता दाते. या मालिकेत अनिताने राधिका या गृहिणीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे तिने या भूमिकेला उत्तम न्याय दिला. अलिकडेच अनिता नवं गडी नवं राज्य या मालिकेत तिने रमाची भूमिका साकारली होती. लवकरच अनिता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिचं  किरकोळ नवरे हे नाटकं रंगमंचावर येतेय. 

आपल्या खमक्या स्वभावाने  नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आता किरकोळ नवरे शोधतेय. ती किरकोळ नवरे का आणि कशासाठी  शोधतेय? हे जाणून  घ्यायचं असेल तर ११ ऑगस्टला रंगभूमीवर येणारं किरकोळ नवरे हे नवं नाटक तुम्हाला बघावं लागेल.

हसून हसून दमछाक करणार डामचिक नाटक अशी  टॅगलाईन असलेल्या या  नाटकात अभिनेत्री अनिता दाते  हिच्यासोबत सागर देशमुख, पुष्कराज चिरपुटकर दिसणार आहेत. अनामिका + युवांजनी  नाटक मंडळी निर्मित, साईसाक्षी प्रकाशित या  नाटकाचे लेखन - दिग्दर्शन  सागर देशमुख याचे आहे. आजवर वेगवेगळया भूमिकांमधून या तिघांनी आपली कमाल दाखवली आहे. आता एकत्र येत हे तिघे काय धमाल करतात यासाठी हे नाटक पहायला हवं. 

मनोरंजनातून अंजन घालणारे हे नाटक करताना आम्ही  खूप मजा करतोय. प्रेक्षकही हे नाटक तितकचं एन्जॉय करतील असा विश्वास हे तिघे व्यक्त करतात. किरकोळ नवरे हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दलचं आहेच, पण नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलही बोलणारं आहे. या नाटकाचे निर्माते अभिजीत देशपांडे, राहुल कर्णिक, दिनू पेडणेकर आहेत. 

 

Web Title: Anita Date, Sagar Deshmukh, Pushkarraj Chirputkar new drama kirkol navre will be on stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.