मराठी कलाकार कोणावर आहे नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 13:07 IST2016-11-21T13:07:53+5:302016-11-21T13:07:53+5:30
कलाकारांसाठी रंगभूमी ही आयुष्यातील खूप महत्वाची जागा असते. कारण त्यांना आपली कला सादर करण्याची संधी याठिकाणी मिळत असते. अक्षरश: कलाकार हे रंगभूमीला अगदी मनापासून पूजत असतात. अशा या महत्वाच्या जागेची दुरअवस्था पाहिली तर साहजिकच कोणी ही चिडणार. अशाच एका प्रसंगाला अभिनेता सुमीत राघवनला सामोरे जावे लागले.

मराठी कलाकार कोणावर आहे नाराज?
क ाकारांसाठी रंगभूमी ही आयुष्यातील खूप महत्वाची जागा असते. कारण त्यांना आपली कला सादर करण्याची संधी याठिकाणी मिळत असते. अक्षरश: कलाकार हे रंगभूमीला अगदी मनापासून पूजत असतात. अशा या महत्वाच्या जागेची दुरअवस्था पाहिली तर साहजिकच कोणी ही चिडणार. अशाच एका प्रसंगाला अभिनेता सुमीत राघवनला सामोरे जावे लागले. नुकतेच एका प्रयोगाच्या निमित्ताने डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात तो गेला होता. तेथील अतिथी कक्षामध्ये तो बसला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी चिन्मयीदेखील होती. या प्रयोगावेळी त्याला नाटयगृहात किती गैरसोई जाणविल्या याचा एक व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्याचबरोबर तो या गैरसोईबाबत अपडेट केलेल्या पोस्टमधून सांगतो की, डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटयगृहाची उत्कृष्ट व्हीआयपी खोली. तेथील अप्रतिम असा कोंदट सुवास. खरंच हुरूप येतो एक कलावंत म्हणून. नाहीतर ती घाणेरडी लंडनची थिएटर्स.. हा व्हिडिओ आणि त्याने पोस्ट केलेल्या स्टेटसमुळे नाट्यगृहांमधील असुविधेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तसेच सुमितने मोबाईल कॅमे-यात टिपलेल्या या व्हिडिओमध्ये नाट्यगृहाचा अतिथी कक्षागृह दाखविण्यात आला आहे. सोफ्याला पडलेले भोक, भिंतीच्या पोपडया उडालेल्या दिसत आहेत. सुमितने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक कलाकारांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री शिल्पा नवलकर म्हणाली की, सुमीत तू तिथे अजून काही प्रयोग कर म्हणजे तुला त्या होलातून उंदीर बाहेर पडताना दिसतील. त्याचबरोबर कल्याणमधील आचार्य अत्रे नाटयगृहात एखादा प्रयोग कर. तिथे मेक अप रुमच्या पडद्यावरच राहात असलेल्या उंदराशी तर मैत्रीच होते आपली. तर प्रशांत दामले सांगतात की, महाराष्ट्रात ६३ नाट्यगृह आहेत पण फक्त आहेत . . . मी मागे लागुन थकलो. परवा नागपुरला मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करतो. आता मी लक्ष घालतो . आता बघु .. पाहूयात आता, कलाकारांसाठी तसा हा नवीन विषय नाही. सातत्याने याविषयी चर्चा करून देखील महानगरपालिका नाटयगृहांकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चला तर पाहूयात सुमितच्या या प्रश्नाने तरी नाटयगृहांची ही समस्या दूर होते का.