Ajit Pawar Funeral: आनंद शिंदेंनी लांबूनच घेतलं लाडक्या 'दादां'चं दर्शन, म्हणाले "आता कोण मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:06 IST2026-01-30T12:05:07+5:302026-01-30T12:06:04+5:30
आनंद शिंदेही अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी पोहचले होते. पण, प्रचंड गर्दी असल्याने त्यांनीही बाहेरुनच अंत्यदर्शन घ्यावं लागलं.

Ajit Pawar Funeral: आनंद शिंदेंनी लांबूनच घेतलं लाडक्या 'दादां'चं दर्शन, म्हणाले "आता कोण मला..."
Anand Shinde Emotional Over Ajit Pawar Funeral : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं. काल विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्या पार्थिवाला सुपूत्र पार्थ आणि जय पवार यांच्याकडून मुखाग्नी देण्यात आला. आपल्या लाडक्या 'दादा'ला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर उसळला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि कलाकार बारामतीत दाखल झाले होते. दादांवर प्रेम करणारे गायक आनंद शिंदेही अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी पोहचले होते. पण, प्रचंड गर्दी असल्याने त्यांनीही बाहेरुनच अंत्यदर्शन घ्यावं लागलं.
बारामतीमध्ये पोहोचूनही अजित पवार यांना अखेरचा निरोप देता आला नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. 'साम टीव्ही'शी बोलताना ते म्हणाले, "आता खरं तर काहीच सुचत नाहीये. इथे इतकी गर्दी आहे की मीसुद्धा आत जाऊ शकलो नाही. हीच खेदाची गोष्ट आहे की, मी बारामतीत येऊन त्यांचं दर्शन घेऊ शकलो नाही, त्यांना फक्त लांबूनच पाहिलं".
आनंद शिंदे आणि अजितदादांचे नाते अत्यंत जवळचे होते. जुन्या आठवणींना उजाळा देताना शिंदे म्हणाले, "ज्या दादांसोबत मी बसलो, उठलो... आता काय सांगायचं? कुणाचं काहीही काम असलं की मी थेट दादांना फोन करायचो. मग दादा सांगायचे 'त्या शिंदेंना घेऊन या'. पण आज दादाच तिथे आहेत, तर कोण मला फोन करुन आतमध्ये बोलावून घेणार?".