अमृताचा ट्रेडिशनल अंदाजात रॅम्पवॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 10:23 IST2017-12-20T04:34:50+5:302017-12-20T10:23:53+5:30
आपल्या अभिनयाने आणि दिलकश अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभेनेत्री अमृता खानविलकर सध्या फारच चर्चेत आहे. अमृता ...
.jpeg)
अमृताचा ट्रेडिशनल अंदाजात रॅम्पवॉक
आपल्या अभिनयाने आणि दिलकश अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभेनेत्री अमृता खानविलकर सध्या फारच चर्चेत आहे. अमृता एका रिअॉलिटी शोमध्ये करत असलेले सूत्रसंचालन तिच्या चाहत्यांना खूपच भावते आहे.
ह्याच मराठ मोळी अभिनेत्रीने नुकतेच एक रॅम्पवाक केले. पुणे फॅशन वीक मध्ये शाही लहंगा-चोली घातलेली अमृता यावेळी फारच खुलून दिसत होती. तिने हे पहिलंच रॅम्पवॉक केलं. विशेष म्हणजे अभेनेता वैभव तत्ववादीनेही अमृता सोबत रॅम्प वॉक केला. या जोडीने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ह्या कार्यक्रमाचे फोटो अमृताने सोशल मीडियावर पोस्ट केले. नववधूचा पेहराव घालून रॅम्पवर उतरलेल्या अमृताचं रॅम्पवॉक सगळ्यांसाठीच लक्षवेधी ठरलं. रामनवमीवर प्रेरित असलेला हा पेहराव खूपच सुंदर आणि वाखाण्याजोग होता. तिच्या या अदानी तिने तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे.
मला जेव्हा यासाठी विचारणा केली होती तेव्हा मला फारच आनंद झाला होता, तसेच हा माझा पहिला रॅम्पवॉक असल्यामुळे तो माझ्या कायम लक्षात राहील, असं अमृता सांगते. रॅम्पवॉक नंतर अमृता अतिशय भावुक झाली होती.
फॅशन डिझायनर श्रुती आणि मंगेशने डिझाईन केलेला अतिशय भरजरी पिवळ्या रंगाचा घागरा, दपका आणि झर्दोसी ने सजवलेली चोळी आणि दुपट्टा यावेळी अमृताने परिधान केला होता. तर तिच्या ह्या पेहरवामुळे तिचं सौंदर्य अधिक खुललं होतं. पती हिमांशूसह तिने डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये'चे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे. काही दिवसांपूर्वी अमृताच्या घरीही तिचा ३२वा वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी तिचा पती आणि टी.व्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रा आणि अमृताच्या आईने तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टी ठेवली होती. बर्थ डे सेलिब्रेशन दरम्यान मराठी अभिनेत्री सोनाली खरेसुद्धा आपल्या खास मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी यावेळी आवर्जून उपस्थित होती. अमृताच्या या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो हिमांशूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वाढदिवसानिमित्त अमृताला पती हिमांशूकडून खास गिफ्टसुद्धा मिळालं आहे.