मला जाऊद्या ना घरी आता वाजले की बारा म्हणणारी आपली अमृता खानविलकर घरी नाही ...
अमृताची कोचीन भरारी
/> मला जाऊद्या ना घरी आता वाजले की बारा म्हणणारी आपली अमृता खानविलकर घरी नाही तर थेट पोहचली आहे कोचीन ला. अमृता कोचीन ला का गेली असा प्रश्न नक्कीच तिच्या चाहत्यांना पडला असेल. कामाच्या स्ट्रेस मधुन थोडा निवांत वेळ काढुन ती मस्तपैकी लाँग हॉलिडेसाठी कोचीन ला गेली आहे असे वाटत असेल तर तसे बिलकुल नाहीये. अमृता कोचीन ला गेलीये ती फक्त कामासाठी म्हणजेच तिच्या आगामी एका चित्रपटाचे शुटिंग कोचीनला असल्याने ती सध्या कोचीनच्या ब्युटिफुल अॅटमॉस्पिअरमध्ये रंगुन गेली आहे. अमृताने सीएनएक्सला तिच्या या कोचीनच्या शुटिंग बाबतीत सांगितले. पहिल्यांदाच मी शुटिंगसाठी कोचीनला आले आहे. आमची संपुर्ण टिम माझ्यासोबत असुन आम्ही मजा, मस्ती धमाल करीत कोचीन मध्ये शुट करीत आहोत. तसेच हे शुटिंग खुप वेगळ््या पद्धतीचे असल्याचे तिने सांगीतले आहे. एवढेच नाही तर याच चित्रपटाच्या पुढच्या सीन्सच्या शुटिंगसाठी ती एका आठवड्याकरीता परदेशात जाणार आहे. तिथे देखील असे वेगळे शुटिंग होणार असल्याचे अमृता म्हणाली. अमृताने या सिनेमाचे नाव जरी गुलदस्त्यात ठेवले असले तरी पुढील एका महिन्याभरात आपल्याला नक्कीच या चित्रपटाबाबत काही गोष्टी समोर येतीलच. तोपर्यंत अमृताला तिच्या या कोचीन भरारी साठी शुभेच्छा