२०२५च्या अखेरीस अमृताचं मोठं सरप्राईज!, बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:07 IST2025-12-15T14:06:40+5:302025-12-15T14:07:12+5:30
Amruta Khanvilkar : २०२५ हे वर्ष संपत असताना अमृता खानिवलकरने तिच्या चाहत्यांना अनेक खास सरप्राईज दिले. एकीकडे नव्या वर्षात अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असून वर्ष संपत असताना नेटफ्लिक्स वरच्या एका नव्या कोऱ्या वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे.

२०२५च्या अखेरीस अमृताचं मोठं सरप्राईज!, बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन
अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. तिने मराठीसह हिंदीतही काम केलंय. अलिकडेच तिने लग्नपंचमी या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करत असल्याचे सांगितले. त्यानंतर आता तिने २०२५च्या अखेरीस चाहत्यांना आणखी एक सरप्राईज दिलं आहे. ती हिंदी वेबसीरिजमध्ये झळकणार आहे आणि तिच्यासोबत बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता झळकणार आहे. तो कोण आहे आणि तिच्या या प्रोजेक्टबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल.
२०२५ हे वर्ष संपत असताना अमृता खानिवलकरने तिच्या चाहत्यांना अनेक खास सरप्राईज दिले. एकीकडे नव्या वर्षात अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असून वर्ष संपत असताना नेटफ्लिक्स वरच्या एका नव्या कोऱ्या वेब सीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकताना दिसणार आहे. ती नेटफ्लिक्सवर दाखल होणाऱ्या तस्करी या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. तिच्यासोबत या सीरिजमध्ये अभिनेता इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने अमृता आणि इमरान हाश्मी यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
अमृताने सोशल मीडिया तस्करीचा टीझर शेअर केला असून तिच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे. तस्करीच्या दुनियेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे असं म्हणत तिने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. इमरान हाश्मीसोबत तिची काय भूमिका असणार? या तस्करीच्या विश्वात अमृताचा काय रोल असणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.