अमृता खानविलवकर नवरा हिमांशू मल्होत्रापासून राहते वेगळी; हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 10:59 IST2024-08-11T10:59:03+5:302024-08-11T10:59:59+5:30

अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्न केले होते.

Amruta Khanvilkar Stay Away From Her Husband Himanshu Malhotra know the reason | अमृता खानविलवकर नवरा हिमांशू मल्होत्रापासून राहते वेगळी; हे आहे कारण

अमृता खानविलवकर नवरा हिमांशू मल्होत्रापासून राहते वेगळी; हे आहे कारण

अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय. अमृताने हिंदी मालिकांमधील अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केले. पण, दोघेही वेगळे राहतात. अमृता मुंबईत तर हिमांशू दिल्लीत राहतोय. ते दोघे एकमेकांपासून दूर का राहत आहेत, यामागचे कारण समोर आले आहे.

अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्न केले. तर या दोघांची पहिली भेट ही २००४ साली झाली होती. इतकी वर्षे ते दोघेही सुखाने संसार करत आहेत, पण दोघेही एकत्र राहत नाही. अमृता ही मुळची मुंबईची व हिमांशू मुळचा दिल्लीचा रहिवासी आहे. अमृता ही मराठी सिनेमांमध्ये काम करते. तर हिमांशूची अनेक कामे दिल्लीत असतात, त्यामुळे तो दिल्लीला आपल्या आई सोबत राहतो. त्यामुळे आपापल्या कामांच्या गरजेनुसार दोघेही आपापल्या ठिकाणी राहतात. मात्र दोघेही आपल्या कामातून वेळ काढत एकमेकांसोबत काही क्षण घालवतात.


अमृता आणि हिमांशुची ओळख 'इंडियाज सिनेस्टार की खोज' सेटवरच या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. भेटल्यापासून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.जवळपास १० वर्षे दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघांचीही चांगली केमिस्ट्री जमली होती.१० वर्ष डेट केल्यानंतर दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. इंडस्ट्रीत अमृता आणि हिमांशू दोघांकडे एक परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते.

Web Title: Amruta Khanvilkar Stay Away From Her Husband Himanshu Malhotra know the reason