Chandramukhi box office collection: अनोख्या प्रेमकथेची प्रेक्षकांना भुरळ; ‘चंद्रमुखी’नं पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 10:13 IST2022-05-01T10:10:22+5:302022-05-01T10:13:27+5:30

Chandramukhi box office collection : ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असं प्रेक्षकांना झालं होतं. अखेर शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात.

Amruta Khanvilkar marathi movie Chandramukhi box office collection day one | Chandramukhi box office collection: अनोख्या प्रेमकथेची प्रेक्षकांना भुरळ; ‘चंद्रमुखी’नं पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

Chandramukhi box office collection: अनोख्या प्रेमकथेची प्रेक्षकांना भुरळ; ‘चंद्रमुखी’नं पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी

Chandramukhi box office collection : ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi ) हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असं प्रेक्षकांना झालं होतं. अखेर शुक्रवारी हा सिनेमा रिलीज झाला आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. अमृता खानविलकरनं (Amruta Khanvilkar) साकारलेली चंद्रा आणि आदिनाथ कोठारेनं (Addinath Kothare) साकारलेला दौलत यांची अनोखी प्रेमकथा पाहून चाहते जणू घायाळ झाले आहेत. बॉक्स ऑफिसवरची सिनेमाची पहिल्या दिवशी कमाई बघून तरी हेच वाटतंय. चित्रपटानं पहिल्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटानंपहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 1.21 कोटींची कमाई केली आहे. सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचं चित्र आहे. प्रेक्षकांचा सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

अमृता खानविलकरनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पहिल्याच दिवशी चंद्रमुखी 1.21 करोडच्या घरात, असं तिनं पोस्टमध्ये लिहिलं आहे. रिलीजच्या अखेरच्या क्षणापर्यंत या चित्रपटाचं अमृता व आदिनाथ दोघांनीही जबरदस्त प्रमोशन केलं. चंद्रमुखीच्या यशात त्याचाही वाटा आहेच.

कच्चा लिंबू, हिरकणी अशा दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरी सांभाळल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.   प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. निर्माते अक्षय बदार्पूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाची  पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहे.  याला अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे.

या चित्रपटात अमृता व आदिनाथशिवाय मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे आदिंच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: Amruta Khanvilkar marathi movie Chandramukhi box office collection day one