'चंद्रमुखी' साठी आधी मला विचारलं गेलं, मानसीच्या दाव्यावर अमृता म्हणाली, 'मला फरक पडत नाही कारण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 08:49 IST2023-02-11T08:48:03+5:302023-02-11T08:49:30+5:30

'चंद्रमुखी' सिनेमा अमृतासाठी खूपच खास आहे. यासाठी तिने प्रचंड मेहनतही घेतली आहे

amruta khanvilkar gives response on chandramukhi movie where mansi naik was offered role firsr | 'चंद्रमुखी' साठी आधी मला विचारलं गेलं, मानसीच्या दाव्यावर अमृता म्हणाली, 'मला फरक पडत नाही कारण...'

'चंद्रमुखी' साठी आधी मला विचारलं गेलं, मानसीच्या दाव्यावर अमृता म्हणाली, 'मला फरक पडत नाही कारण...'

'चंद्रमुखी' मराठी सिनेमातून अभिनेत्री अमृता खानविलकर हिने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिची आणि आदिनाथ कोठारेची केमिस्ट्रीही चांगलीच लोकप्रिय झाली. मात्र चंद्रमुखी साठी वेगळ्याच एका अभिनेत्रीला भूमिका ऑफर झाली होती. मला चंद्रमुखी साठी विचारण्यात आल्याचा दावा मानसी नाईकने केला होता. आता मानसीच्या या दाव्यावर अमृताने स्पष्ट उत्तर दिले आहे.

'चंद्रमुखी' सिनेमा अमृतासाठी खूपच खास आहे. यासाठी तिने प्रचंड मेहनतही घेतली आहे. मानसीच्या दाव्यावर अमृता नुकतंच बोलली आहे. मराठी ओटीटीवरील एका कार्यक्रमात अमृता म्हणाली, 'फिल्म इंडस्ट्रीत असं कायमच घडतं.‘चंद्रमुखी’ हा विषय खुला होता. सिनेमाचे राईट्स दोन वर्षांपूर्वी अक्षय बर्दापूरकरने विकत घेतले. त्याआधी अनेक वर्ष अनेक लोक जाऊन विश्वास पाटील यांना सतत विचारणा करत होते.मानसीबरोबर माझं काहीही बोलणं झालेलं नाही. पण असंही असू शकतं की कोणीतरी हा प्रोजेक्ट करत असावा आणि  तिला त्यासाठी विचारणा केली असावी.पण त्यात काहीही गैर नाही. मला अशा अनेक चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली. पण त्यानंतर पुढे त्यात कोणीतरी वेगळीच अभिनेत्री दिसली.'

प्रियांका चोप्राचे वाक्य लक्षात ठेवते

अमृता म्हणाली,  प्रियांका चोप्राचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवते, माझ्या आधी कोणाला विचारलं गेलंय किंवा नाही गेलंय, याने मला काहीही फरक पडत नाही. मी ते पात्र करते हे तेव्हाच ठरतं, जेव्हा मी त्या चित्रपटाच्या सेटवर जाते. मी त्या सेटवर गेले आणि ती भूमिका केली. जेव्हा प्रसाद ओक माझ्याकडे ‘चंद्रमुखी’ घेऊन आला, तेव्हा त्याने मला माझी ‘चंद्रमुखी’ मात्र तूच आहेस असं सांगितलं होतं आणि मी त्याला होकार दिला.'
 

Web Title: amruta khanvilkar gives response on chandramukhi movie where mansi naik was offered role firsr