अमृता खानविलकर म्हणतेय, "चिऊताई चिऊताई दार उघड"; गश्मीर महाजनीसोबतचा डान्स चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 14:53 IST2025-03-03T14:52:15+5:302025-03-03T14:53:00+5:30
Amruta Khanvilkar : सुपरहिट लावण्या सादर केल्यानंतर आता अमृता सुशीला- सुजीत या चित्रपटात पहिल्यांदा आइटम साँग करणार असून तिच्या नृत्याची पुन्हा एकदा जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

अमृता खानविलकर म्हणतेय, "चिऊताई चिऊताई दार उघड"; गश्मीर महाजनीसोबतचा डान्स चर्चेत
कायम चर्चेत असलेली अमृता पुन्हा एक खास सरप्राईझ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजते आहे. अमृता सुशीला- सुजीत सिनेमामध्ये आयटम साँग केले आहे. चिऊताई चिऊताई दर उघड असं या गाण्याचं बोल आहेत. अमृता तिच्या अभिनय प्रवासात पहिल्यांदाच आइटम साँग करणार आहे. कायम उत्तम भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री असली तरी तिच्या नृत्याचे सगळेच चाहते आहेत यात शंका नाही.
सुपरहिट लावण्या सादर केल्यानंतर आता अमृता सुशीला- सुजीत या चित्रपटात पहिल्यांदा आइटम साँग करणार असून तिच्या नृत्याची पुन्हा एकदा जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुशीला- सुजीत मधील हे आइटम साँग नक्कीच काहीतरी कमाल आहे आणि नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात अमृता या गाण्यात दिसते आहे. आजवर अमृताने अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्या आणि त्यातून प्रेक्षकांना मोहित केले आहे. आता अमृता या नव्या आइटम साँगमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकणार यात शंका नाही. अमृता या गाण्यात तिच्या आवडत्या मित्रासोबत म्हणजेच गश्मीर महाजनी सोबत स्क्रीन स्पेस शेयर करणार आहे.
सुशीला- सुजीत या चित्रपटाची निर्मिती ही स्वप्नील जोशी याच्यासह मंजिरी व प्रसाद ओकने केली आहे. सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे आणि निलेश राठी हेदेखील या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.