अमृताने मानले कांदबरीचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:09 IST2016-06-14T08:39:54+5:302016-06-14T14:09:54+5:30
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपण नेहमीच कॅट फाइट पाहत असतो. या अभिनेत्रीचे हिच्यासोबत पटत नाही. ही आली म्हणून ती कार्यक्रम सोडून ...
.jpg)
अमृताने मानले कांदबरीचे आभार
ब लीवुड इंडस्ट्रीमध्ये आपण नेहमीच कॅट फाइट पाहत असतो. या अभिनेत्रीचे हिच्यासोबत पटत नाही. ही आली म्हणून ती कार्यक्रम सोडून गेली. किवा त्या ही पलीकडे जाऊन या दोन अभिनेत्री एकाच सेटवर असून ही दोघीं बोलत नाही. अशा अनेक चर्चा आपण ऐकत असतो. पण नेमकी मराठी इंडस्ट्रीमध्ये हे चित्र उलट आहे. या इंडस्ट्रीमध्ये एक मैत्रिण दुसºया मैत्रिणीला मदत करते. आणि त्या ही पुढे जाऊन दुसरी मैत्रिण तिचे सोशलमिडीयावर आभार मानते. या दोन मैत्रिणी आहेत मराठी इंडस्ट्रीच्या सुंदर अभिनेत्री अमृता सुभाष आणि कादंबरी कदम. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना कादंबरी कदम म्हणाली, आम्ही दोघी खूप बेस्ट फ्रेंड आहोत. सैराटच्या सक्सेस पार्टीसाठी आम्ही दोघी एकत्रित शॉपिंगला अंधेरीला गेलो होतो. त्यावेळी मी अमृताला सजेस्ट केले की, हा ड्रेस घे खूप छान दिसेल. आणि तिने काही कारणं न देता माझ्या चॉइसचा ड्रेस घेतला. आणि तो पार्टीसाठी परिधान देखील केला. ही तर तिची एक्साइटमेंट आहे की,तिने सोशलमिडीयावर अपडेट केले आहे. भारी ना सेलेब्रिटी असून ही एक अभिनेत्री दुसºया अभिनेत्रीचे आभार मानते.असो, ये दोस्ती यू ही बरखरार रहे, यही हम दुआ करेगें.