अमृता अडकली लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 15:06 IST2017-01-08T15:06:14+5:302017-01-08T15:06:14+5:30
मिस इंडियाचा किताब आपल्या नावी करणारी आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता पत्की नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. अमृताने ...

अमृता अडकली लग्नबंधनात
म स इंडियाचा किताब आपल्या नावी करणारी आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता पत्की नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. अमृताने मराठमोळ््या मुलाशी लग्न केल्याचे समजतेय. होय, जो कानेकर हे तिच्या नव-याचे नाव आहे. पुण्यात अमृता आणि जोचा विवाहसोहळा पिरंपारिक पदधतीने अगदी थाटामाटात पार पडला. महाराष्ट्रीय पद्धतीने हे दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने त्याचवर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिस अर्थ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आणि एवढेच नाही तर तिथेही मिस अर्थ एअरचा किताब मिळवला होता. अमृताने २०१० मध्ये 'हाईड अँड सीक' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण हिंदी चित्रपटसृष्टीते फारसे यश न मिळाल्याने ती मराठी सिनेमांकडे वळली होती. 'सत्य सावित्री सत्यवान' या सिनेमाद्वारे २०१२ मध्ये अमृताने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले. अलीकडेच तिची मुख्य भूमिका असलेला 'कौल मनाचा' हा मराठी सिनेमा रिलीज झाला होता. अमृता ही अभिनेत्री तर आहेच परंतू ती एक प्रसिद्ध मॉडेल देखील आहे. मुंबईच्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात अमृताचा जन्म झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अमृताला ग्लॅमर जगताची पार्श्वभूमी नव्हती. पण तरीही तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अमृता सध्या देशातील एक अग्रणी मॉडेल म्हणून ओळखली जाते.देश-विदेशातील नामवंत फॅशन डिझायनर्ससाठी तिने रॅम्प वॉक केले आहे. त्याबरोबरच आपली संगीताची आवड जपत आंतरराष्ट्रीय संगीत मैफलींचे निवेदनही ती करते. आता लग्नबंधनात अडकल्यानंतर अमृता चित्रपटसृष्टीला रामराम ठोकते का हे पाहावे लागेल.