अमृताने शिकली कन्नड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 12:55 IST2016-07-04T07:25:18+5:302016-07-04T12:55:18+5:30

अमृता सुभाष नेहमीच तिच्या भूमिकेसाठी कितीही कष्ट घ्यायला तयार असते. तिने नुकतेच एका चित्रपटासाठी कन्नड भाषा शिकली आहे. ज्येष्ठ ...

Amrita learned Kannada | अमृताने शिकली कन्नड

अमृताने शिकली कन्नड

ृता सुभाष नेहमीच तिच्या भूमिकेसाठी कितीही कष्ट घ्यायला तयार असते. तिने नुकतेच एका चित्रपटासाठी कन्नड भाषा शिकली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री बी.जयश्री यांच्याकडून तिने कन्नडचे धडे गिरवले आहेत. अमृताच्या आगामी चित्रपटातील अनेक संवाद हे कन्नडमध्ये होते. हे संवाद केवळ पाठ करून बोलण्यात अमृताला अजिबातच रस नव्हता. त्यामुळे तिने कन्नड भाषा शिकण्याचे ठरवले. यासाठी तिने काही अनुवादकांची मदत घेतली आणि त्यांच्याकडून हे संवाद समजून घेतले. पण प्रत्येक भाषेचा एक लहेचा असतो, तो समजून घेण्यासाठी अमृताने तिच्या आईची मैत्रीण बी. जयश्री यांच्याकडून मदत घेण्याचे ठरवले. अमृताची भूमिकेविषयी उत्सुकता जाणून त्यांनीदेखील तिला कन्नड भाषा शिकवायचे ठरवले. चित्रपटात संवाद कशाप्रकारे बोलले पाहिजेत हे शिकवण्यासाठी त्या अमृताकडे पुण्याला गेल्या. अमृताने त्यांच्याकडून भाषा तर शिकली. पण त्याचसोबतच त्यांचं कन्नडमधील बोलणं रेकॉर्ड करून घेतलं. त्या कशाप्रकारे बोलत आहेत याचा लहेजा समजून घेतला. या सगळ्या मेहनतीमुळेच मला माझी भूमिका खूप चांगल्यप्रकारे साकारता आली असे अमृता सांगते. 

Web Title: Amrita learned Kannada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.