अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकरच्या मैत्रीत फूट? मुलाखतीत स्पष्टच सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 14:23 IST2023-08-30T14:20:51+5:302023-08-30T14:23:05+5:30
एका गप्पांच्या कार्यक्रमात अमृता खानविलकर हिनं सईसोबतच्या मैत्रीवर खुलासा केला.

Amrita Khanwilkar and Sai Tamhankar
आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये टशन असल्याचं पाहायला मिळत आहे. आता कॅटफाइट्स मराठी सिनेसृष्टीतही असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एका गप्पांच्या कार्यक्रमात अमृता खानविलकर हिनं सईसोबतच्या मैत्रीवर खुलासा केला. सई आणि तिच्यातील मैत्रीवर भाष्य केलं आहे.
अमृता खानविलकर ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या आगामी भागामध्ये हजेरी लावली. अमृता आणि अवधूत गुप्तेचा या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अवधूत गुप्तेने अमृताला सई ताम्हणकरचा फोटो दाखवला आणि तिच्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न विचारला.
त्यावर अमृताने “सई ताम्हणकर एक अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते. मी तिची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला. पण मला समोरुन तसा प्रतिसाद मिळाला नाही, असं अनेकदा झालं आहे”.
त्यानंतर अवधूत गुप्तेने “काही भांडण वैगरे झालं होतं का?” असा प्रश्न अमृताला विचारला. त्यावर अमृताने “नाही नाही, अजिबात नाही. आता आपण एकाच सिनेसृष्टीत काम करतो, पण म्हणून आपण अगदीच सगळ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतो, असेही नाही”. सई आणि अमृता या दोघींनी 'पाँडिचेरी' चित्रपटात एकत्र काम सुद्धा केले होते.
अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिचे लाखो चाहते आहेत.