संजय जाधवच्या चित्रपटात झळकणार अमृता खानविलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 16:42 IST2016-12-23T16:42:28+5:302016-12-23T16:42:28+5:30

दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम ...

Amrita Khanvilkar will be seen in Sanjay Jadhav's film | संजय जाधवच्या चित्रपटात झळकणार अमृता खानविलकर

संजय जाधवच्या चित्रपटात झळकणार अमृता खानविलकर

ग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायला मिळावे अशी अनेक कलाकारांची इच्छा आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आज मराठीत एक आघाडीची अभिनेत्री मानली जाते. तिने हिंदीतदेखील आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. 
याच वर्षी तिने आणि तिची पती हिमांशू मल्होत्राने नच बलिये या कार्यक्रमाचे विजेतेपददेखील मिळवले होते. तसेच 24 या अनिल कपूरच्या मालिकेतही ती झळकली होती. तसेच सध्या तिने रणवीर सिंहसोबत नुकतेच काही इव्हेंटदेखील केले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत अतिशय व्यग्र असली तरी तिला मराठीत काम करायचे आहे आणि त्यातही तिला संजय जाधव यांच्यासोबत काम करायचे आहे.
अमृता अनेक वर्षं मराठी चित्रपटांमध्ये काम करत आहे. तरीही आजही तिने एकही चित्रपट संजयसोबत केलेला नाही. त्याच्यासोबत काम करण्याची कित्येक वर्षांपासूनची तिची इच्छा आहे. अमृता गेल्या 10 वर्षांपासून संजयला ओळखते. त्या दोघांची खूप चांगली मैत्रीदेखील आहे. त्यामुळे संजयसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने त्याला अनेकवेळा बोलावूनही दाखवले आहे. पण काही केल्या दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळालेली नाही. पण पुढील वर्षी अमृतासोबत काम करायचेच असे संजयने ठरवले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुढील वर्षी संजयने दिग्दर्शित केलेल्या एका चित्रपटात अमृताला पाहाता येणार आहे. 
संजय सध्या चार चित्रपटांच्या पटकथांवर काम करत आहे. या वर्षांत त्याचे तीन-चार तरी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.  





Web Title: Amrita Khanvilkar will be seen in Sanjay Jadhav's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.