​अमृता खानविलकर का भडकली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 17:22 IST2017-04-19T11:52:04+5:302017-04-19T17:22:04+5:30

अमृता खानविलकर सध्या चांगलीच चिडलेली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही आणि तिने तिचा हा राग सोशल मीडियाच्या ...

Amrita Khanvilkar throws away? | ​अमृता खानविलकर का भडकली?

​अमृता खानविलकर का भडकली?

ृता खानविलकर सध्या चांगलीच चिडलेली आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही आणि तिने तिचा हा राग सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. तिने काही महिलांना उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे आणि त्यात म्हटले आहे की, मी माझे पती हिमांशू मल्होत्रासोबत फोटो पोस्ट करत नाही यावरून मला अनेक महिलांच्या अतिशय वाईट प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. माझे हिमांशूवर प्रेम नसल्याने मी आमचे फोटो टाकत नाही असेदेखील काहींचे म्हणणे आहे. मी या प्रतिक्रियांवर अनेक दिवसांपासून विचार करत आहे. मी या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करू की यावर सडेतोड उत्तर देऊ हा विचार माझ्या मनात कित्येक दिवसांपासून सुरू होता. पण गप्प बसण्यापेक्षा आपले मत मांडावे असे मला नेहमीच वाटते. त्यामुळे या महिलांना मी उत्तर देण्याचे ठरवले आहे. मी हिमांशूशी लग्न केले आहे आणि माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे. पण याचा अर्थ मी माझे प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करावे असे होत नाही. ज्या महिलांनी मला यावरून वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यांनी त्यांची मते त्यांच्यापर्यंतच ठेवावीत. तुम्हाला माझे फोटो, व्हिडिओ आवडत नसतील तर मला फॉलो करू नका. मी माझ्या जगात खूप खूश आहे. कृपया लोकांच्या वैयक्तिक जीवनाचा मान राखावा. तुम्ही प्रतिक्रिया देत असताना तुमच्या चरित्राविषयी त्यातून लोकांना कळत असते हे प्रतिक्रिया देताना लक्षात घ्यावे. तसेच लोकांना ब्लॉक करणे अथवा कमेंट डिलीट करणे हे मला ही पोस्ट लिहिण्यापेक्षा सोपे गेले असते. पण तुमच्यासोबत हे शेअर करावे असे वाटल्याने मी हे सगळे लिहित आहे. 

Web Title: Amrita Khanvilkar throws away?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.