नाकातील नथ लावतेय अमृता खानविलकरच्या सौंदर्याला चार चांद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 14:30 IST2020-05-08T14:26:03+5:302020-05-08T14:30:30+5:30
नाकातील नथ अमृताच्या सौंदर्याला चार चांद लावले आहेत.

नाकातील नथ लावतेय अमृता खानविलकरच्या सौंदर्याला चार चांद
मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. 'राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. अमृता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते. अमृताने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत अमृता खूपच सुंदर दिसतेय. नाकातील नथ अमृताच्या सौंदर्याला चार चांद लावले आहेत. या फोटोतील तिच्या अंदावर तिचे फॅन्स फिदा झाले आहेत.
अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.